गुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री पालकमंत्री श्री. उदय सामंत व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सुचनेनुसार रायगड लोकसभा मतदार संघाचे निरिक्षक मंगेशजी सातमकर दि.12 रोजी दुपारी 3 वा. चिपळूण बहादूर शेख नाका येथील पुष्कर हॉल येथे उपस्थित रहाणार आहेत. Shiv Sena officials to meet at Chiplun

यावेळी गुहागर विधानसभा मतदार संघातील शिवसेना संघटना बांधणीचा आढावा व विकास कामे मंजूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, तरी सर्व शिवसेना पदाधिकारी, जिल्हासमन्वयक, उप जिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तालुका संघटक, तालुका समन्वयक, शहरप्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, युवक शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला कार्यकारीणी व युवासेना पदाधिकारी व तालुक्यातील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका सचिव संतोष आग्रे यांनी केले आहे. Shiv Sena officials to meet at Chiplun
