गुहागर, ता. 12 : ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्राबरी देवस्थान गुहागर येथे देवदिवाळी उत्सव उद्या बुधवार दि. 13 डिसेंबर 2023 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने जत्राही भरणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. अशी विनंती देवस्थानमार्फत करण्यात आली आहे. Devdiwali at Guhagar Bhairi Vyaghrabari Temple

ग्रामदेवतेच्या देवदिवाळी उत्सवनिमित्त बुधवार 13 डिसेंबर रोजी सकाळी 5 ते 5.30 वा. काकड आरती, सकाळी 6.30 ते 7.30 वा. अभिषेक व पूजा, सकाळी 9 वा. देवांना रुपे लावणे, स. 10 ते रात्रौ 9 वाजेपर्यत देवदर्शन, रात्रौ 9.30 नंतर गावातील भजनांचा कार्यक्रम, तसेच गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. देवीची रुपे उतरविणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. अशी विनंती देवस्थानचे अध्यक्ष श्री. शरद शेटे, सेक्रेटरी अरुण गुरव, खजिनदार मुरलीधर बागकर व देवस्थानचे कमिटी सदस्य यांचेमार्फत करण्यात आली आहे. Devdiwali at Guhagar Bhairi Vyaghrabari Temple
