गुहागर, ता. 09 : तालुक्यातील भातगाव येथील मेहनती भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षातील एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. चिपळूण शाखेतील तिसरे, तर वैयक्तिक दुसऱ्यांदा एमडीआरटी प्राप्त केले आहे. तसेच 2024 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. MDRT Award to Dheeraj Mundekar
विमा प्रतिनिधी धीरज मुंडेकर भातगाव सारख्या दुर्गम भागात उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या मेहनतीने दुसरा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. याबाबत बोलताना श्री. मुंडेकर म्हणाले, सतत अधिकाधिक लोकांना भेटून उत्तम सेवा देताना विमा संरक्षणही वाढवून देण्यात यशस्वी झाल्याने हे शक्य झाले. यासाठी मेहनत तर आहेच. पण तुमचे सर्वांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली. या यशात माझे कुटुंब, चिपळूण ब्रांच मॅनेजर श्री. सागर देवार्डेकर, विकास अधिकारी श्री. शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी, माझे आदर्श संतोष वरंडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. MDRT Award to Dheeraj Mundekar