• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 October 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सामाजिक कार्यकर्ता हरपला

by Ganesh Dhanawade
December 9, 2023
in Guhagar
225 2
1
Narendra Varadkar is No More
441
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नरेंद्र वराडकर यांचे निधन

गुहागर, ता. 09 : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या अडीअडणींना धावून जाणारे आणि शहरातील प्रसिद्ध वेल्डर नरेंद्र दीनानाथ वराडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथे शुक्रवारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. Narendra Varadkar is No More

शहरातील खालचापाट येथील (सद्या राहणार वरचापाट) नरेंद्र उर्फ नरू दीनानाथ वराडकर (वय ५८) यांना दोन दिवसांपूर्वीच अस्वस्थ वाटू लागल्याने डेरवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. वराडकर यांना पत्नी, तीन मुली आहेत. वडील कै. दीनानाथ तलाठी होते. त्यांनी शृंगारतळी, वेळब, साखरपा, संगमेश्वर याठिकाणी सेवा बजावली होती. याभागात वास्तव्यास असताना नरेंद्र वराडकर यांनी असंख्य मित्र परिवार जोडला होता. शहरातील किंवा परिसरातील आजारी पडल्यास त्याला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे काम वराडकर करत असे. श्री दुर्गादेवी देवस्थान यांच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून असंख्य रुग्णांना रात्री अपरात्री घेऊन जाण्याचे काम देखील ते गेली अनेक वर्षे करत होते.  Narendra Varadkar is No More

वराडकर कुटुंबाला हा तिसरा धक्का आहे. वर्षभरात त्यांची आई, पंधरा दिवसांपूर्वी भाचा वारला होता. आता नरेंद्र वराडकर यांच्या जाण्याने हा तिसरा धक्का आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला असून शहरातील सामाजिक कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत. वराडकर यांच्यावर शनिवारी सकाळी खालचापाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. Narendra Varadkar is No More

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNarendra Varadkar is No MoreNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share176SendTweet110
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.