• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोखंडी रॉडने तरुणाच्या डोक्यावर गंभीर प्रहार

by Guhagar News
December 8, 2023
in Guhagar
262 2
0
A young man was hit on the head with a rod
514
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संशयित आरोपीची जामीनावर सुटका

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील बोऱ्या फाटा येथे दि. ३ डिसें. २०२३ रोजी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास दोन तरुणांमध्ये झालेल्या वादावादीमध्ये सचिन पोळेकर नामक व्यक्तीने संकेत पाटील या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने गंभीर प्रहार केला होता. या घटनेमध्ये संकेत पाटील गंभीररित्या जखमी झाला होता. A young man was hit on the head with a rod

ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सचिन पोळेकर हा पोलिसांपासून नजरेआड राहिला होता. संध्याकाळी गुहागर पोलिसांना सचिन पोळेकर याला पकडण्यात यश आले. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३२६, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सचिन पोळेकर यांची चिपळूण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. A young man was hit on the head with a rod

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायलायकडे आरोपीची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केलेली होती. आरोपीच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. ॲड. संकेत साळवी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून चिपळूण न्यायालयाने आरोपी सचिन पोळेकर याची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या केसमध्ये ॲड. संकेत साळवी यांना त्यांचे सहकारी ॲड. अलंकार विखारे, ॲड. रिया कोळवणकर व ॲड. पूजा माळी यांनी मदत केली. A young man was hit on the head with a rod

Tags: A young man was hit on the head with a rodGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share206SendTweet129
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.