रत्नागिरी, ता. 05 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणे महाविजय मिळवला आहे. लोकसभेची सेमीफायनल जिंकलो आहोत, आता लक्ष्य लोकसभेवर तिसऱ्यांदा महाविजय मिळवण्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि कर्तुत्व यांचा संगम आणि महिला, युवा, गरिबांसाठी राबवलेल्या योजनांमुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे नेते, माजी आमदार, रत्नागिरी विधानसभा क्षेत्राप्रमुख बाळ माने यांनी केले. Won semi-final, now target Lok Sabha
चार राज्यांतील निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. भाजपाला मध्यप्रदेशात १६४ जागा, राजस्थान १०९ आणि छत्तीसगडमध्ये ५४ जागा प्राप्त झाल्या आहेत. याबाबत बाळ माने म्हणाले की, या तीनही राज्यांतील निवडणूक भाजपाने परिश्रमाने जिंकली असून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली यश मिळवले आहे. महिला आरक्षण, युवा, गरिबांसाठी योजना आदींमुळे भाजपाला या राज्यांत उत्तुंग यश मिळाले आहे. या राज्यांतील निवडणुका म्हणजे सेमीफायनल होती. आता लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी जिंकायची आहे. त्याकरिता आम्ही सर्वजण आधीपासूनच काम करू लागलो आहोत. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विनोदजी तावडे, खासदार नारायणराव राणे, नीलेशजी राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील जागा जिंकू असा विश्वास या वेळी बाळ माने यांनी व्यक्त केला. Won semi-final, now target Lok Sabha