• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समाजसेवा करणाऱ्या वीणा लेले यांचा गौरव

by Guhagar News
December 4, 2023
in Ratnagiri
61 0
0
Glory to Veena Lele who served the society
119
SHARES
340
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्याताई पटवर्धन; वासंती दांडेकर प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता पुरस्कार

रत्नागिरी, ता. 04 : समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या बालवाडी शिक्षिका (कै.) वासंती दांडेकर या सहृदय होत्या. त्यांच्याप्रमाणेच समाजसेवा करणाऱ्या वीणा शिरीष लेले यांना पुरस्कार देताना आनंद होत आहे, त्यांचे कार्य पाहताना आदर वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या कार्यवाहिका विद्याताई पटवर्धन यांनी केले. Glory to Veena Lele who served the society

जयेश मंगल पार्क येथे रविवारी वासंती दांडेकर प्रतिष्ठानचा पहिला कृतज्ञता पुरस्कार स्वगृही सेवा (शिरिषालय) संस्थेच्या संस्थापिका विणा लेले यांना प्रदान केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानच्या प्रमुख उमा दांडेकर, निशा अंतरकर उपस्थित होत्या. वीणा लेले यांच्या कार्याची माहिती उमा दांडेकर यांनी दिली. Glory to Veena Lele who served the society

सत्काराला उत्तर देताना वीणा लेले म्हणाल्या, २००८ मध्ये स्वगृही सेवा संस्था स्थापन केली. त्यानंतर वृद्धाश्रम सुरू करताना अनेक अडचणी येत होत्या. परंतु वृद्धाश्रम सुरू करा, असे सांगणारेही अनेक जण होते. आजीव सदस्य, विश्वस्त यांच्यामुळे संस्थेचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. वृद्धाश्रमाची समाजाला गरज आहे का असे प्रश्नही अनेकांनी विचारले परंतु स्वतःवर वेळ आल्यानंतर अनेकांना असे वृद्धाश्रम हवेत, हे जाणवते. आजारी, वृद्ध, महिला, पुरुषांना येथे ठेवले जाते. शिरगाव येथे हा वृद्धाश्रम सुरू असून आता केळ्ये येथेही नवीन वृद्धाश्रमाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र, गोव्यात संस्थेला कार्य करायचे आहे. Glory to Veena Lele who served the society

नटराजपूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर ठाणे येथील युवा कलाकार ओम विद्वांस व तन्मय माने यांचा जगलर कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. पूर्वा साने यांनी सूत्रसंचालन केले. माधवी फडके यांनी गीत सादर केले. कांचन जोग यांनी पसायदान सादर केले. अनिल दांडेकर यांनी आभार मानले. अनिल दांडेकर यांनी सांगितले, आई सामाजिक कार्यात सक्रिय होती, त्यामुळे तिच्या स्मरणार्थ वासंती दांडेकर प्रतिष्ठान स्थापन केले आहे. गेल्या वर्षी काही संस्थांना आर्थिक मदत दिली. यंदा प्रथमच कृतज्ञता पुरस्कार दिला. प्रतिष्ठानतर्फे नवनवीन प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. Glory to Veena Lele who served the society

Tags: Glory to Veena Lele who served the societyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.