संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरा रुढी व सण जोपासण्यासाठी गुहागर तालुक्यातील आबलोली गावातील ग्रामस्थ अजूनही प्रयत्नशिल असून दिवाळी नंतर अवघ्या बारा दिवसांनी येणाऱ्या या वाघबारस सणाचं महत्व व प्रथा टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पागडे वाडीतील मंडळी व या सणासाठी खास मुंबई पुण्याहूनही चाकरमानी अगदी आवर्जून उपस्थित राहून एकत्र येऊन आजच्या वैज्ञानिक व आधुनिक युगातही लोप पावत चाललेल्या प्रथांपैकी वाघबारस हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli
![Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/12/gn0112.jpg)
![Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/12/gn0112.jpg)
जून्या जाणत्या मंडळींच्या माहितीनूसार हा सण गुराख्यांशी संबंधीत असून शेतीची कामे आटोक्यात आल्यानंतर धनधान्याने भरलेल्या शेतीची मळणी करून दाणा घरात घेतल्यानंतर गुरे जंगलात उनाड सोडून दिली जातात. म्हणून वाघापासून आपल्या गुराढोरांचं रक्षण व्हावे यासाठी सर्व गावकरी गुराखी एकत्रित जमून गुरांची गोठण असलेल्या गोठण देवाला साकडे घालून व भाताचा नैवेद्य देवून वाघाला गावातून पिटाळून लावतात. अशी या सणाची आख्यांकीका आहे. या कार्यक्रमात सर्व सहभागी होऊन वाघाची वेशभूषा केलेल्या वेशधारी वाघाला पळवून लावतात. वाघरो-वाघरो अशी गर्जना देत फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून सोडतात. Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/11/add-4-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/11/add-4-1.jpg)
वैज्ञानिक आणि आधुनिक युगात लोप पावत चाललेली ही प्रथा आबलोली गावातील दोन्ही पागडेवाडितील गावकरी मंडळी व विशेष करून सध्याची नविन पिढी यात अगदी हौसे मौजेने भाग घेतात. या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सायंकाळी प्रत्येक घरातील अंगणातील तुळशीचा विवाह अंगणात शेणाचा सडा काढून व नक्षीदार रांगोळी काढून तुळशीला साज चढवून पारंपारिक पध्दतीने लग्न लावली जातात. आजच्या आधुनिक युगात पारंपारिक अशा सणांचं महत्व टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli