33 व्या वर्धापनदिनानिमित्त महापूजा व ग्राहक मेळावा दि. 8 रोजी
गुहागर, ता. 02 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. रत्नागिरी शाखा अडूर यांच्या वतीने शाखेच्या 33 वा वर्धापनदिन शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी स. 10 ते सायं. 5 यावेळेत तिर्थप्रसाद लाभ घ्यावा, असे रत्नागिरी शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. Ratnagiri District Central Adoor Branch Anniversary

या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सकाळी 11 वा. ग्राहक मेळावा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून र.जि.म.स. बॅक लि. रत्नागिरीचे संचालक मा. डॉ. अनिल विठ्ठल जोशी, मा. श्री. राजेंद्र दिनकर सुर्वे, मा. श्री. संजय राजाराम रेडीज उपस्थित राहणार आहेत. Ratnagiri District Central Adoor Branch Anniversary
तरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या सभासद, ठेविदार, कर्जदार, हितचिंतक आदिंनी ग्राहक मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री. महेश चंद्रशेखर रजपूत, सहाय्यक सरव्यवस्थापक क्षेत्रिय कार्यालय, पाटपन्हाळे, श्री. नंदन ज्ञानेश खानविलकर व्यवस्थापक क्षेत्रिय कार्यालय, पाटपन्हाळे आणि श्री. जनार्दन एकनाथ भागडे, शाखाधिकारी अडूर यांनी केले आहे. Ratnagiri District Central Adoor Branch Anniversary

