पवारसाखरी बंगालवाडी रस्त्याचे भूमिपूजन
गुहागर, ता. 01 : राज्यात सत्ता असूनही भाजप कार्यकर्त्यांच्या विकास कामांना निधी मिळत नाही म्हणून कार्यकर्ते नाराज होते. मात्र आज भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर यांनी पवारसाखरी बंगालवाडी रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. भाजपकडून विकास कामांचा पहिला नारळ फुटला असून यापुढे असे क्षण वारंवार येतील. अशी इच्छा उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. Bhoomipujan of Pawar Sakhari Bengalwadi Road
गुहागर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तालुक्यातील काही विकास कामांसाठी शिफारस केली. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह भाजपच्या मंत्र्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्यातील काही कामांचे भूमिपुजन आमदार भास्कर जाधव यांनी केले. त्यामुळे भाजप आणि उबाठा सेनेमध्ये श्रेयवादाचे युध्द सामाजिक माध्यमांमधुन सुरु झाले. महाराष्ट्रात महायुतीचीचे सरकार आल्यानंतर आपल्या विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा येथील भाजपचे कार्यकर्ते करत होते. त्यावेळी उबाठा सेना आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते विकासकामांचे नारळ फोडत होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटत चालला होता. आम्ही लोकांकडे मते कशी मागणार असा प्रश्र्न सातत्याने भाजपच्या बैठकांमधुन विचारला जात होता. अशा प्रतिकुल परिस्थितीत काम करताना आज भाजप कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस उजाडला. Bhoomipujan of Pawar Sakhari Bengalwadi Road
पंचायत समिती माजी सदस्य अरूण रहाटे, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पवारसाखरी बंगालवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास निधी मागितला होता. गुहागर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ विनयजी नातू यांनी या कामाची शिफारस पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे जनसुविधा योजनेतून या कामाला 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. यासंदर्भातील अधिकृत पत्र मिळताच भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर यांनी पवारसाखरी बंगालवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. Bhoomipujan of Pawar Sakhari Bengalwadi Road
यावेळी सचिन ओक म्हणाले की, अजुनही अनेक विकास कामे मंजुर होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. गुहागर विधानसभा क्षेत्रातील 16 मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. या कार्यक्रमाला आरेगावचे माजी सरपंच श्रीकांत महाजन, तालुका सरचिटणीस सचिन ओक, खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष व आंबेरेखुर्दचे सरपंच रविंद्र अवेरे, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष रघुनाथ घाणेकर, पवारसाखरी सरपंच सौ. प्राची पवार, ग्रामपंचायत सदस्य समीर पेडणेकर, राजू हरचिलकर, निकीता शितप, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत म्हसकर, अनिल म्हसकर, सतीश वरेकर, दिलिप किजबिले, रूपेश किजबिले, चंद्रकांत पवार, गंगाराम पवार, पांडुरंग कोळंबेकर, विश्राम कुळे आदींसह बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. Bhoomipujan of Pawar Sakhari Bengalwadi Road