• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ ग्रामस्थांची एकमुखी मागणी

by Guhagar News
November 25, 2023
in Guhagar
132 1
0
One-sided demand of Umrath villagers
259
SHARES
740
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आम्हाला नुकसान भरपाई नको, उपद्रवी वन्य पशू यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा

गुहागर, ता. 25  : तालुक्यातील उमराठ गावातील ग्रामस्थांची प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या सोबत नूकतीच ग्रामदेवताच्या मंदिरात बैठक झाली. सदर बैठकीत मौजे उमराठ ग्रामस्थांच्या शेती पिकांचे व बागायतींचे वानर, माकडे व  रानडुक्कर या उपद्रवी वन्य प्राण्यांपासून नुकसान होत असलेबाबतच्या तक्रारीची चौकशी करून वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसानीची भरपाईबाबत व त्या संबंधीचे शासन निर्णय याची माहिती वन अधिकारी संजय दुडगे यांनी ग्रामस्थांना दिली. One-sided demand of Umrath villagers

One-sided demand of Umrath villagers

तत्पूर्वी दि. ७/११/२०२३ रोजी उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी चिपळूण-गुहागर विभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी राजेश्री कीर मॅडम यांना पत्राद्वारे वानर आणि माकडे  पकडण्यासाठी पिंजरे किंवा फिरती वॅन मिळण्यासाठी मागणी केलेली होती. त्यानुसार चौकशीसाठी ग्रामस्थ शेतकर्‍यांसोबत गुहागर तालुका प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. One-sided demand of Umrath villagers

One-sided demand of Umrath villagers

यावेळी ग्रामस्थांनी व्यथा मांडताना सांगितले की, आमच्या उमराठ गावामध्ये व परिसरात वानर, माकडे व रानडुक्कर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. नासधूस करत आहेत. परंतु सदरची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणी येतात, पंचनामा वेळेवर होत नाही, वेळ वाया जातो. नुकसान भरपाई मिळालीच तरी ती  तुटपुंजी असते. त्यामुळे शासनाने शेतीपिकांचे नुकसान भरपाई देण्यापेक्षा नुकसान करणारे उपद्रवी वन्यप्राणी वानर, माकडे आणि रानडुक्कर या प्राण्यांचा शासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. One-sided demand of Umrath villagers

यामध्ये वानर, माकडे यांना पकडून नसबंदी करणे, पिंजरे किंवा फिरते व्हॅन लावून त्यांना पकडून शासनाचे मार्फत अभयारण्यामध्ये सोडणे किंवा शासनाने शेतकऱ्यांना परवानेसहीत बंदुका देऊन वानर, माकडांना मारण्यासाठी परवानगी देणे असे उपाय सुद्धा सुचवण्यात आले. ग्रामस्थ शेतकर्‍यांच्या या एकमुखी मागणीवर शासनाने गांभीर्याने लवकरात-लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना वानर माकडे व रानडुक्कर यांच्याकडून होणाऱ्या नुकसानी पासून वाचविण्यात यावे, अशी विनंती उमराठ ग्रामस्थ शेतकर्‍यांच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. One-sided demand of Umrath villagers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOne-sided demand of Umrath villagersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.