शिंपी समाजाकडून स्वागत, कन्याकुमारी प्रवासाला दिल्या शुभेच्छा
गुहागर, ता. 07 : पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील पौराणिक देवालये आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचे कार्याची माहिती संकलित करण्यासाठी पुण्यातील सायकलस्वार सुशील बोबडे हे कन्याकुमारीकडे प्रवास करीत आहेत. प्रवासादरम्यान ते गुहागरमध्ये आले असता येथील शिंपी समाजाच्या बंधु भगिनींनी त्यांचे स्वागत केले. Bicyclist Sushil Bobde in Guhagar

पूणे कर्वेनगर येथील सायकलस्वार आणि सामाजिक कार्यकर्ते सुशील बोबडे यांनी पुणे ते कन्याकुमारी व भुवनेश्वर ते नागपूर सायकल प्रवासाचा संकल्प केला. 25 ऑक्टोबरला ते पूण्यातून कन्याकुमारी या पहिल्या टप्प्यातील प्रवासाला निघाले. मजल दरमजल करीत ते 6 नोव्हेंबरला गुहागरला पोचले. गुहागरमध्ये गुहागर तालुका नामदेव शिंपी समाजाच्या अध्यक्षा सौ. रेश्मा बारटक्के, सौ. कामिनी बावधनकर, सौ. भाग्यश्री बारटक्के व सौ. मनाली बावधनकर यांनी स्वागत केले. समाजातील बंधु भगिनींशी गप्पा मारताना सुशील बोबडे यांनी आपल्या सायकल प्रवासाबाबत माहिती दिली. Bicyclist Sushil Bobde in Guhagar

सुशील बोबडे म्हणाले की, कोणताही घाट नसेल तर दिवसाला 80 ते 90 किलोमीटर प्रवास सायकलने करता येतो. कोकणातील घाटात मात्र दिवसाला 40 ते 50 किलोमिटरचा प्रवास होणेही मुश्किल होते. त्यातही माझ्या प्रवासाचे उद्दीष्ट माहिती संकलनाचे आणि जनजागृतीचे असल्याने हा प्रवास अधिक मंदगतीने होत आहे. माझ्या प्रवासात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील पौराणिक देवालये यांची तपशीलवार माहिती संकलित करत आहे. तसेच संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जीवनप्रवासात त्यांनी त्या त्या ठिकाणी काय केले याची माहिती देखील संकलीत करत आहे. या दोन्ही कामांसाठी थांबलो की तेथे भेटणाऱ्या ग्रामस्थांना प्रदुषण टाळ्यासाठी पर्यावरण वाचविणे, वृक्ष लागवड करणे, आनंदी रहाण्यासाठी निसर्गाचे रक्षण आवश्यक असा संदेशही संवादातून देत असतो. Bicyclist Sushil Bobde in Guhagar

कोकणात नारळाच्या बागा भरपुर आहेत. मात्र या आजही येथील लोक पारंपरिक पध्दतीनेच नारळ पाडा करतात. पुण्यामध्ये मी यंत्राद्वारे नारळावर चढून नारळ पाडा करण्याचा व्यवसाय करतो. आपल्याकडील नारळ बागायतदारांनी देखील यांत्रिकीकरणाद्वारे स्वावलंबी व्हावे. तसेच नारळ पाडा करणाऱ्या टीमने यांत्रिकरणाचा स्विकार करावा. असे आवाहन सुशील बोबडे यांनी केले. Bicyclist Sushil Bobde in Guhagar
