मिशन आपुलकी उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर, ता. 21 : जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्रा. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या दिमाखदारपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सानिया वनकर ह्या होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. Amrit Mahotsav celebrated in Veldur School

प्रमुख पाहुणे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विक्रांत जाधव साहेब, गुहागरचे गटविकास अधिकारी केळसकर साहेब, आंतरराज्य सरपंच पुरस्कार विजेते श्री जनार्दन आंबेकर, वेलदूरच्या सरपंचा सौ दिव्या ताई वनकर, उपसरपंच राजू शेठ जावळे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्री दत्ताराम वनकर, पोलीस कॉन्स्टेबल भावेश रोहीलकर शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर, केंद्रप्रमुख किरण सूर्यवंशी, श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे श्री नारायण रोहीलकर, श्री विठ्ठल रखुमाई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकर कोळथरकर. श्री गणेश ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संदीप वणकर, नवानगर मोहल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते सलीम सरनोबत, अजीज मणियार, केंद्रप्रमुख सुरेश कदम, माजी मुख्याध्यापिका वंदना माने, माजी मुख्याध्यापक प्रमोद कचरेकर शाळा स्थापनेच्या वेळचे विद्यार्थिनी श्रीमती लीला चंद्रकांत वनकर, वेलदूर नंबर 1 शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर, माजी मुख्याध्यापक गणेश विचारे, अंजनवेल नंबर दोन शाळेचे शिक्षक श्री आंधळे, सामाजिक कार्यकर्ते पंची साहेब, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, हर्षाली रोहीलकर, प्राजक्ता जांभरकर, रूपाली जाधव, रूपाली घरट, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, देवराम भोसले, सुदाम कोळथरकर, शैलेश रोहीलकर श्रीराम महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा ताई रोहिलकर, श्री विठ्ठल रुक्माई महिला मंडळाच्या अध्यक्षा रश्मी ताई पटेकर, शनिदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा विदुला वनकर, निवृत्त अधिकारी दुर्वास वनकर, शिक्षक नेते अरविंद जी पालकर पल्लवी घुले, मनसे विभाग अध्यक्ष अंजनवेल चे स्वप्निल कांबळे, रणवी शाखा अध्यक्ष मनोहर धोपट, मनसे वेलदूर शाखा अध्यक्ष वैभवजी आंबेरकर, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी फणसे, प्रकाश पड्याळ, निलेश धामणस्कर, ग्रामविकास अधिकारी राजाराम कुळे, नवानगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, दिलीप पालशेतकर, दशरथ नाटेकर, रामदास धोपावकर, सुदर्शन जांभरकर, चंद्रकांत दाभोळकर मोहल्याचे कार्यकर्ते दिलावर महालदार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरक्षा रोहिलकर, नामदेव वनकर, निलेश दाभोळकर, रमेश रोहीलकर, दीपक वरवटकर, मनोज पावसकर, अंजली मुद्दामवार, उलघना पाटील, परीक्षित दाभोळकर, विठोबा दाभोळकर, अंकिता कोळथरकर तसेच सर्व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी युवा वर्ग महिला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विक्रांत जी जाधव साहेब उपस्थित होते. Amrit Mahotsav celebrated in Veldur School

सकाळी माजी विद्यार्थी ग्रामस्थ विद्यार्थी भव्य जनसमुदायांमध्ये अभूतपूर्व रॅली काढण्यात आली. शाळेच्या वाटचालीबद्दल माजी विद्यार्थी यांच्यातर्फे अभिमान गीत सादर करण्यात आले. त्याला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. मान्यवरांच्या शुभहस्ते जागामालक गोपाळ रोहीलकर पाटील, 1947 रोजी स्थापन झालेल्या या शाळेच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी श्रीमती लीला चंद्रकांत वनकर व जनार्दन धाकटू कोळथरकर यांचा तसेच विविध स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेचे माजी विद्यार्थी जे आता मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षक नेते श्री अरविंद पालकर, माजी शिक्षक श्री सुरेश कदम, प्रमोद कचरेकर, वंदना माने, पल्लवी घुले यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. Amrit Mahotsav celebrated in Veldur School

माजी विद्यार्थिनी वयोवृद्ध श्रीमती लीला चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विक्रांत जाधव साहेब यांच्या शुभहस्ते शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शाळेने डिजिटल शाळा, वर्चुअल स्कूल, बाला इव्हेंट स्कूल, केंद्र शासनाचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार, जिल्हा परिषदचा आदर्श शाळा पुरस्कार, एपीएल स्कूल, आनंददायी शाळा, शिक्षणाच्या वारीमध्ये राज्यस्तरावर वर्धा, नांदेड, जळगाव, मुंबई, कोल्हापूर येथे निवड, तंबाखूमुक्त शाळा, क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर सहभाग, शाळाबाह्य विद्यार्थी विरहित शाळा, शंभर टक्के पट नोंदणी उपस्थिती, विक्रमी शैक्षणिक उठाव, उत्कृष्ट पालक व समाज सहभाग, फिरती प्रयोगशाळा, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र, निसर्ग सर्व विज्ञान शिबिर, सिद्धी ट्रस्ट शालेय विकास प्रकल्प, ग्राहक भांडार, परसबाग एक दिवस शाळेसाठी असे अनेक उपक्रम राबवले असून शाळेबाबत मान्यवर यांनी गौरव उद्गार काढले. त्यानंतर आजी-माजी विद्यार्थी यांचा बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. Amrit Mahotsav celebrated in Veldur School

मिशन आपुलकी अंतर्गत शाळेला प्रिंटर, कुलर, ऑफिस टेबल, फॅन, शेगडी, वजन काटा, पृथ्वीगोल प्रतिकृती, घड्याळ, पाच सतरंज्या, रंगकाम, इलेक्ट्रिक ट्यूबलाईट, लोकमान्य टिळक फोटो, डॉक्टर आंबेडकर फोटो, राज्याभिषेक सोहळा फोटो, फुलांच्या माळा सेट छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती, सरस्वती मूर्ती, फ्लावर पॉट, यासारख्या अनेक वस्तू माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे कडून प्राप्त झाल्या असून त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विक्रांत जाधव व गटविकास अधिकारी केळसकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Amrit Mahotsav celebrated in Veldur School
त्यावेळी बोलताना माजी अध्यक्ष विक्रांतजी जाधव साहेब म्हणाले की, शाळेचा हा उपक्रम एखाद्या उत्सवासारखा संपन्न होत असताना मला हा कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. ग्रामस्थांच्या अभूतपूर्व प्रतिसाद बद्दल त्यांनी गौरवो उद्गार काढले. हा अमृत महोत्सव अनेक दृष्टीने लक्षात राहील कारण या कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनी श्रीमती लीला चंद्रकांत वनकर या उपस्थित आहेत. तसेच सदरचा कार्यक्रम हा त्याच दिवशी संपन्न होतो आहे. शाळेच्या सर्वांगीण गुणवत्ता प्रगतीसाठी शिक्षक पालक ग्रामस्थ यांचे एकत्रित योगदान फार मोलाचे लाभत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आपणा सर्वांना लाभल्याचे त्यांनी नमूद केले. Amrit Mahotsav celebrated in Veldur School

शाळेच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल अमृत महोत्सव कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थी व ग्रामस्थ देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उलघना पाटील, अंजली मुद्दमवार, तनिष्का नाटेकर, मनोज पावसकर, मनोज पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था श्रीराम महिला मंडळ, अल्पोपहार चहा पाण्याची व्यवस्था श्री विठ्ठल रखुमाई महिला मंडळ व उपस्थित यांना बुंदी लाडू याचा खर्च शनिदेव महिला मंडळ यांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, श्री विठ्ठल रुक्माई ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, श्री गणेश ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ व नवानगर मोहल्ला येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी योगदान दिले. Amrit Mahotsav celebrated in Veldur School
