गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वरवेली तंटामुक्त समितीची बैठक वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष वैभव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वरवेली गावामध्ये मंगळवार पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवा सदर्भात चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव हे नागरिकांनी शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. Varveli Tantamukt Samiti meeting concluded

गौरीगणपती विसर्जन करताना लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात यावी. खोल पाण्यात विसर्जन करताना गणेश भक्तांनी काळजी घ्यावी. अशाही सुचना नागरिकांना करण्यात आल्या. तसेच ग्रामसूरक्षा दल निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. वरवेली आगरेवाडी येथील रविंद्र आगरे यांच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुरू असलेल्या घराचे बांधकाम त्यांच्याच कुटुंबीयांकडून जमीन दोस्त केल्याने त्या घराचा पंचनामा तंटामुक्त समितीने करावा असे ठरले. त्यानुसार जमीन दोस्त केलेल्या घराच्या बांधकामाचा पंचनामा तंटामुक्त समितीने केला. पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी गुहागर पोलीस स्टेशनला पत्र देण्याचे ठरले. गावामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे कुणी काम केले तर तंटामुक्त समितीच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे ठरले. Varveli Tantamukt Samiti meeting concluded

या सभेमध्ये बोलताना तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार यांनी गावामध्ये तंटे झाल्यानंतर मिटविण्यासाठी जाण्यापेक्षा गावामध्ये तंटेच होणार नाहीत याची खबरदारी तंटामुक्त समितीकडून घेतली जाईल. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले जाईल. जर एखाद्या व्यक्तीने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई तंटामुक्त समितीकडून केली जाईल. गावामध्ये अनेक सोशल मीडियाचे ग्रुप आहेत. या ग्रुप वर समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे मेसेज टाकू नयेत. याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. Varveli Tantamukt Samiti meeting concluded
या सभेला सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, गणेश किर्वे, ग्रामपंचायत सदस्य संदिप पवार, नरेश रांजणे, प्रतिक्षा किर्वे, प्रल्हाद विचारे, आशिष विचारे, विजय रांजणे, सुभाष आगरे, दिवाकर कानडे, संतोष अवेरे, सागर पवार, तलाठी गावित, अनंत जावळे, पो.पा. सुजित शिंदे, ग्रामसेवक महेंद्र भुवड आदी उपस्थित होते. Varveli Tantamukt Samiti meeting concluded
