कोकण किनारा पथकाला १० सन्मान चिन्ह व रोख रक्कम
गुहागर, ता. 16 : नोकरी व्यवसायानिमित्ताने शहरात गेलेल्या कोकणातील मुलांनी एकसंघ होऊन कोकण किनारा भजन मंडळ व कोकण किनारा गोविंदा पथक सुरु केले. या गोविंदा पथकातील मुलांची क्रिकेटच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली होती. ती ओळख टिकण्यासाठी व कोकणातली मुलांना एकत्र येण्यासाठी हे गोविंदा पथक सुरु केले. या पथकाने नऊ ठिकाणी सलामी दिली. Govinda team of boys from Konkan in Virar

दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी घासकोपरी विरार नगरीत झालेला गोपाळकाला हा कोकण किनारा गोविंदा पथकाचे २ रे वर्ष होते. गोविंदा पथकाची ही संकल्पना सुशांत जोशी, पंकज जोशी, महेश येद्रे, अभिषेक वाघे, प्रभु धावडे, हेमंत खांडेकर, रोहित घाणेकर यांनी साकारली. सोबत त्यांनी अनेक गावांतील मुलांना एकत्र केले. या गोविंदा पथकाने २ महिने रोज सराव करून ५ थरांची सलामी दिली तसेच गोल फिरता मोनोरा करुन मानवंदना दिली. भर पावसाची जोरदार संततधार सुरू असताना हि थरावर थर रचत आयोजकांची मने जिंकली. Govinda team of boys from Konkan in Virar

या गोविंदा पथकात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी, शिवणे गाव, कुडली माटलवाडी, दोडवली, सडे जांभारी, पालशेत, वाडदई, चिंद्रावले, पिंपर अर्नव (गोविंदा टॉपर) चिपळूण तालुक्यातील तनाली, दापोली तालुक्यातील दलखनवाडी रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, खेड तालुक्यातील जैतापुर, राजापूर तालुक्यातील आडिवरे, देवगड – विजय दुर्ग, गुजरात -पालगापुर, नेनपर, राजापूर – देवीहसोळ, आबाये गाव, पारवाडी, मंडणगड तालुका – पन्हाळी बुद्रुक अशी अनेक कोकणातली मुलं एकत्रितपणे सहभागी होऊन बोरीवली, दहिसर, मीरारोड, नालासोपारा, अशा नऊ ठिकाणी सलामी दिली. यावेळी एकुण १० सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन कोकण किनारा गोविंदा पथकाला सन्मानित करण्यात आले. Govinda team of boys from Konkan in Virar

