पुणे, ता. 15 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत. Rashtriya Swayamsevak Sangh co-ordination meeting begins


या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, डॉ. मनमोहनजी वैद्य, अरूण कुमारजी, मुकुंदाजी आणि रामदत्त चक्रधरजी, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सुरेशजी सोनी, व्ही. भागैय्याजी, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का जी, प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीताक्का, ‘महिला समन्वय’ च्या वतीने चन्दाताई साठे, ‘स्त्री शक्ती’च्या अध्यक्षा शैलजा जी, राष्ट्रीय सेवा भारतीच्या महामंत्री रेणु पाठक, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचन्द्र खराड़ी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजशरण शाही, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, ‘विद्या भारती’चे अध्यक्ष रामकृष्ण राव, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकान्त चतुर्वेदी (निवृत्त), भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, ‘संस्कृत भारती’चे संघटन मंत्री दिनेश कामत यांचा समावेश आहे. Rashtriya Swayamsevak Sangh co-ordination meeting begins


तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय व सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होईल. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेही आदानप्रदान करण्यात येईल. या बैठकीचा समारोप 16 सप्टेंबर रोजी होईल. Rashtriya Swayamsevak Sangh co-ordination meeting begins

