• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुणबी नागरी सहकारी संस्थेत प्रशिक्षण शिबीर संपन्न

by Guhagar News
September 14, 2023
in Guhagar
101 1
0
Training Camp at Kunbi Civil Cooperative Credit Institution
198
SHARES
565
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पतसंस्था हे मंदिर आहे त्याचे पावित्र्य जपलं पाहिजे; ए.आर.कळंत्रे

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमीटेड आबलोली या पतसंस्थेत २५ कोटींची उलाढाल होत आहे.  कुणबी पतसंस्था हि नियमानुसार चालत असून सभासदांनी क्रियाशील राहण्यासाठी ठेवी ह्या ठेवल्याच पाहिजेत आणि कर्ज हि घेतले पाहिजे. कुणबी पतसंस्था हि सभासदांची आहे, असे स्पष्ट प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे सहकार विकास अधिकारी श्री.ए.आर.कळंत्रे यांनी केले. ते गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमीटेड आबलोली या पतसंस्थेच्या २२ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक, महिला – पुरुष सभासदांना एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. Training Camp at Kunbi Civil Cooperative Credit Institution

या प्रशिक्षण शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना श्री.ए.आर.कळंत्रे पुढे म्हणाले की, कर्ज काढताना नियम, कारण आणि तारण काय? या गोष्टींची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. सहकारामध्ये १/-,१/- रुपयाचा हिशोब ठेवला जातो. मी हुमणे गुरुजींच्या टिमचे कौतुक करतो कुणबी पतसंस्थेच्या कामासारखे कुठल्याच पतसंस्थेचे काम नाही. कुणबी पतसंस्थेच्या वतीने या पुढे आरोग्य शिबीर, आरोग्य प्रबोधन व्याख्याने, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन झाले पाहिजे. सभासद जगला पाहिजे घेतलेले कर्ज वेळेतच फेड करा सभासदांनी सहकार तत्त्वांचा अंगीकार केला पाहिजे संस्थेच्या हिताचे विरुद्ध कुणीही वागू नये, असा संदेश हि जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री.ए.आर.कळंत्रे यांनी दिला. Training Camp at Kunbi Civil Cooperative Credit Institution

यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी, पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.तुकाराम निवाते, जिल्हा सहकारी बोर्डाचे अधिकारी श्री.ए.आर.कळंत्रे, जेष्ठ संचालक श्री.पांडूरंग पाते, गणपतशेठ पाडावे, गुहागरचे माजी नगराध्यक्ष श्री.राजेश बेंडल, पतसंस्थेचे संचालक श्री.प्रदिप बेंडल, महादेव वणे, संदेश कदम, वैभव आदवडे, उदय गोरीवले, अमोल वाघे, अनंत पागडे, संदिप पाष्टे,अनिल घाणेकर, संचालिका श्रीमती.वनिता डिंगणकर, सौ.श्रावणी पागडे, माजी सभापती विलास वाघे, माजी उपसभापती सिताराम ठोंबरे, शंकर मोरे, अनिल हुमणे, संजय गोताड, माजी सरपंच तुकाराम पागडे, प्रमोद गोणबरे, विजय मसुरकर, अनिकेत पागडे, शिवराम निवाते, अनंत मोरे, सुदर्शन निकम, दिपक हुमणे, बबन हुमणे, सिताराम हळ्ये, सिताराम कावणकर, शांताराम गोरीवले, शंकर जोशी आदींसह संपर्क प्रमुख तसेच महिला – पुरुष सभासद बहूसंख्येने उपस्थितीत होते. Training Camp at Kunbi Civil Cooperative Credit Institution

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTraining Camp at Kunbi Civil Cooperative Credit InstitutionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.