गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या (Regal College Shringartali) नर्सिंगच्या विद्यार्थीनींचा शपथविधी दि. ११ सप्टेंबर रोजी पार पडला. सदर शपथविधी कार्यक्रम आणि दिपप्रज्वलन हा फ्लोरेन्स नाईंटगेल यांच्या कार्यास मानवंदना म्हणून आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींना शपथ दिली. Oath Ceremony of Regal College Students

यावेळी विष्णुपंत पवार मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात उपस्थित पाहुणे डॉ. राजेंद्र पवार, रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे आणि प्रा.सौ. साक्षी मोहिते यांनी दिपप्रज्वलन करून आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर सौ.मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नर्सिंग विभाग प्रमुख सौ.साक्षी मोहिते यांनी केली. यामध्ये त्यांनी जगातील आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. Oath Ceremony of Regal College Students

प्राचार्या सौ.रेश्मा मोरे आणि सौ.साक्षी मोहिते यांनी त्यांच्या ‘लॅम्प लाईटनिंग’ पार पडला. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींचा रोज सेरेमनी सौ.साक्षी मोहिते आणि प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी पार पाडला. सदर कार्यक्रमामध्ये कु.सानिका पारदळे, कु.अवंतिका पावसकर, कु.अल्मास काझी, कु.सानिया तळदेवकर आणि कु. नियाली जांभारकर या विद्यार्थीनिनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी नर्सिंग क्षेत्राचे महत्व सांगितले. डॉ.राजेंद्र पवार सर यांनी मनोगत व्यक्त करताना, आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ.पवार यांनी वैद्यकीय व नर्सिंग या क्षेत्रांचे महत्व सांगितले. या क्षेत्रांमध्ये दोन महत्वाचे खांब आहेत ते म्हणजे डॉक्टर आणि नर्स. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र हे सेवाभावी वृत्तीने केले जाते. तसेच रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असते हे त्यांनी सांगितले. त्यामध्ये त्यांनी खेड्यातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी रिगल कॉलेजने उपलब्ध करून दिल्यामुळे रिगल एज्युकेशन सोसायटीचे कौतुक केले. Oath Ceremony of Regal College Students

रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी मनोगतात, त्यांनी आद्यपरीचारिका आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. नर्सिंग विभाग प्रमुख सौ.साक्षी मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित पाहुण्यांना आणि विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थीनिंचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शाहरुख चोगले सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे आणि नर्सिंग केयरच्या प्राध्यापिका साक्षी मोहिते उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. Oath Ceremony of Regal College Students
