• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिव्यांगांना मोफत फळ वृक्षाचे वाटप

by Mayuresh Patnakar
September 13, 2023
in Guhagar
60 0
3
Distribution of free fruit trees to the disabled
117
SHARES
335
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत वरवेली येथील कार्यालयात सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मोफत फळ वृक्षांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही नारळाची झाडे संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री विनायक ओक गुरुजी यांनी मोफत दिली. संस्थेमार्फत गेली 19 वर्षे  या फळवृक्ष वाटप कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. यावेळी 50 गरजू दिव्यांगांना मान्यवरांचे हस्ते नारळ वृक्षांचे वाटप करण्यात आले. Distribution of free fruit trees to the disabled

या कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व फळ वृक्षाचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये श्री उदय रावणंग सर यांनी संस्था स्थापनेपासून केलेल्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती सांगितली. तसेच संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती व संस्थेच्या असलेल्या विविध समस्या यांची माहिती सांगितली. तसेच फळ वृक्ष वाटपाचे महत्त्व स्पष्ट केले. Distribution of free fruit trees to the disabled

Distribution of free fruit trees to the disabled

 प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना चिपळूण लायन क्लबचे राजेंद्र इंदुलकर यांनी गेली 21 वर्षे दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी चालवलेल्या या सेवाभावी संस्थेचे कौतुक केले. तसेच या दिव्यांग संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नवनियुक्त व संस्थेचे पदसिद्ध सल्लागार, अध्यक्ष कुणबी कर्मचारी संघटना गुहागर मा. श्री दीपक रामाने यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.  श्री रामाने सर यांनी संस्थेची गरज लक्षात घेऊन संस्थेला रुपये दहा हजाराची देणगी दिली. यावेळी चिपळूणच्या जेष्ठ कीर्तनकार सौ. अंजली अरविंद साने यांनी संस्थेला लागणारी भांडी भेट म्हणून दिली. Distribution of free fruit trees to the disabled

Distribution of free fruit trees to the disabled

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन क्लबचे चिपळूण येथील मा. राजेंद्र इंदूरकर, सेवानिवृत्त बँक मॅनेजर व प्रसिद्ध कीर्तनकार श्री शरद तांबे, श्री अरविंद साने – चिपळूण, संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. विनायक ओक, श्री प्रकाश बापट, श्री रवींद्र कुळये, श्री दीपक रामाने, गुहागर हायस्कूलच्या पर्यवेक्षिका सौ. सुजाता कांबळे, संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग, उपाध्यक्ष श्री प्रकाश अनगुडे, सरचिटणीस श्री सुनील रांजाणे आदी मान्यवर तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. Distribution of free fruit trees to the disabled

Distribution of free fruit trees to the disabled

संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री विनायक ओक गुरुजी, श्री प्रकाश बापट सर‌ यांनी उपस्थितितांना मोलाचे मार्गदर्शनशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश अनगुडे सर यांनी केले तर आभार श्री भरत कदम सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य श्री अनिल जोशी,  सौ. सानिका रांजाणे, श्री प्रवीण मोहिते, श्री संतोष घुमे यांनी विशेष प्रयत्न केले. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. Distribution of free fruit trees to the disabled

Tags: Distribution of free fruit trees to the disabledGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यादिव्यांगमराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.