जगातील एकमेव ऑर्गन निर्माते बाळ दाते यांचा सहभाग
नवी दिल्ली, ता. 10 : राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपुत्र उमाशंकर (बाळ) दाते यांना G20 summit २०२३ च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन स्व निर्मित आँर्गनदवर कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यावर जिल्हाभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोकणाच्या सुपुत्राने तयार केलेल्या रिड आँर्गनचे सुर जगातील मातब्बर मंडळींना ऐकायला मिळाले. Bal Date’s organ tunes on the stage of G20

रत्नागिरीपासून चाळीस कि.मी. अंतरावर असलेल्या आडिवरे नावाच्या एका छोट्याशा टिपिकल कोकणी गावात वडिलोपार्जित किराण्याचं दुकान चालवत असतानाच रक्तातील संगीताने स्वस्थ बसू दिले नाही. म्हणून दुकान भावाकडे सोपवून व संगीत विशारद होऊन राजापूरच्या शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी पत्करल्यानंतर एक दिवस एका अनोख्या प्रवासाला सुरवात झाली. ज्याचा संबंध संगीत जगतातून लुप्त होत चाललेल्या “ऑर्गन” नावाच्या वाद्याशी होता. अवघ्या ८/९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रवासाने बाळ दाते या नावाला केवळ आपल्या देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायला सुरवात केली. Bal Date’s organ tunes on the stage of G20

स्व-निर्मित ऑर्गन्समधून गंधर्वांचे स्वर्गीय सूर निर्माण करणारे आडिवऱ्यातील उमाशंकर उर्फ बाळा दाते हे आज ऑर्गन्सचे जगातील एकमेव निर्माते आहेत. ही प्रत्येक मराठी माणसासाठी विलक्षण कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. जुन्या संगीत नाटकात या रिड ऑर्गनचा वापर केला जायचा मात्र काळाच्या ओघात हे रिड ऑर्गन कालबाह्य झाले होते. उमाशंकर दाते यानी या कालबाह्य झालेल्या रिड ऑर्गनला पुन्हा जीवदान देण्यात यश मिळवले आहे, सध्या त्यानी बनवलेले या ऑर्गनना देशाबाहेरही प्रचंड मागणी आहे. Bal Date’s organ tunes on the stage of G20

त्याना सध्या दिल्ली येथे सुरु असलेल्या जी २० कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. आडिवरे सारख्या छोट्या खेडेगावातून ते जगातील प्रमुख 20 देशाच्या प्रमुखांसमोर जाऊन आपली ओळख दाखवण हे खरच खूप मेहनतीने आणि जिद्दीने शक्य होते त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Bal Date’s organ tunes on the stage of G20
