आबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला शासन मान्यता प्राप्त दर्जा..!
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला दि बॅाम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ कलम ५ अन्वये जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडून कडुन शासन मान्यता प्राप्त हॅास्पिटल हा दर्जा मिळाला आहे. City facilities now in rural areas

यामुळे आबलोली गावासह आबलोली पंचक्रोशीतील गरीब, गरजू रुग्णांना विविध स्पेशालिस्ट डॅाक्टरांच्या OPD & IPD, ECG , अत्याधुनिक Digital X-ray , Pathology Lab, Endoscopy, फिजीओथेरपी, हाडांचे प्लॅस्टर व विवीध शस्त्रक्रिया ( जसे की मुळव्याध-भगंदर-फिशर आदी गुद मार्गातील आजार, हर्निया, हायड्रोसिल, सुंथा, अपेंडिक्स, स्तनामधील व शरीरावरील गाठी, डायबिटीसच्या व न भरणाऱ्या जखमा, दुभंगलेले कान, हात व पायावरीत विविध शस्त्रक्रिया इत्यादी. ) या मोठ्या शहरांमधील सुविधा आता आबलोली गावामध्येच उपलब्ध झालेल्या आहेत. City facilities now in rural areas

आबलोली येथील ग्रामिण भागातील दुर्गम व अत्यावश्यक आरोग्य सेवेपासुन कित्येक वर्ष वंचित राहिलेल्या आबलोली पंचक्रोशी वासियांसाठी मागील २.५ वर्षापासुन डॅा. गौरव तुकाराम निवाते (General surgeon), डॅा. स्नेहल गौरव निवाते, डॅा. तेजश्री तुकाराम निवाते हे आरोग्य सेवा देत आहेत. यापुढेही अशीच रुग्णसेवा आपल्या “सुश्रुत हॅास्पिटल” मो.नं.९४०३३६३३२१ मार्फत आंम्ही करत राहू आपणही यामध्ये आंम्हा सर्वांची साथ द्यावी. असे जाहिर आवाहन व नम्र विनंती मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तुकाराम बाबाजी निवाते, सौ.तृप्ती तुकाराम निवाते, डॉ.गौरव निवाते, डॉ.स्नेहल निवाते, डॉ.तेजश्री निवाते यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. City facilities now in rural areas

