• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी बाजारपेठ पुलावरील दहीहंडी ठरली लक्षवेधी

by Ganesh Dhanawade
September 8, 2023
in Guhagar
214 2
0
Dahi handi on the Sringaratali market bridge
420
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील बाजारपुल मार्केट येथील दहीहंडी उत्सव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात दही हंडी उत्सव साजरा करतात. Dahi handi on the Sringaratali market bridge

यावर्षीही या उत्सवामध्ये शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट व्यापारी तसेच अन्य व्यापाऱ्यासह आठवडा बाजारामध्ये सहभागी असणारे व्यापारी सर्वजण सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटला. सर्व व्यापारी प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतात. हे या दहीहंडीचे वैशिष्ट्य आहे. या दहीहंडी उत्सवासाठी तालुक्यातील अनेक गोविंदा पथकाने सलामी दिली. गोविंदा पथकासाठी विशेष काळजी घेण्याचे काम येथील सर्व व्यावसायिक करत होते. हजारोंच्या उपस्थितीत ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. Dahi handi on the Sringaratali market bridge

या उत्सवासाठी उत्सव प्रमुख सुभाष रजपुत, रामचंद्र देवळेकर, जितेंद्र शिरगावकर, दत्ताराम कोंडविलकर, विनोद जानवळकर, विनायक शिर्के, विठ्ठल घाणेकर, किरण पोळेकर, कमलाकर वनगे, सुनिल बेंद्रे, गणपत पागडे, महेश अवेरे, वसंत जानवळकर, मनोहर कळंबटे, प्रशांत शिरगावकर हे सर्व व्यापारी तसेच अन्य व्यापारी एकत्र येऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हा उत्सव साजरा करतात. यावेळी दिवसभर विविध समजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. आलेल्या सर्व मान्यवरांचा  व भाविकांचा गुलाब पुष्प देउन गौरव सर्व व्यापारी करत होते. एकंदरीत उत्साही वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.  Dahi handi on the Sringaratali market bridge

Tags: Dahi handi on the Sringaratali market bridgeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.