• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कन्यादान नाट्यप्रयोगाला मुंबईत उस्फुर्त दाद

by Ganesh Dhanawade
September 6, 2023
in Bharat
166 2
5
Response to Kanyadan drama experiment in Mumbai

कन्यादान नाटकातील एक प्रसंग.

327
SHARES
933
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तळवली भेळेवाडी येथील नवोदित लेखक व दिग्दर्शक अमित पोफळे

गुहागर, ता. 06 : ग्रामीण बोलीतील आणि ग्रामीण भागातील कलाकारांच्या अप्रतिम कलेतून साकारलेल्या मुंबईमधील दादर येथील शिवाजीनाट्यगृहात पार पडलेल्या कन्यादान या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील नवोदित लेखक व दिग्दर्शक अमित पोफळे यांच्या ग्रामीण मातीतील वर्तमानकाळातील वास्तव दाखवणाऱ्या कन्यादान या नाट्यकलाकृतीने हसू आणि आसू चे हुबेहूब वास्तव रसिक प्रेक्षकांना दाखवून दिले आहे. यातील ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम भूमिकांना सर्वांनीच डोक्यावर घेतले. Response to Kanyadan drama experiment in Mumbai

श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धारसाठी आयोजित करण्यात आलेल्या व सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली प्रस्तुत या नाट्यप्रयोगाला सामाजिक कार्यकर्ते व भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर,लालबागचा राजा ट्रस्टचे प्रशांत केळस्कर, चला हवा येऊ द्या फेम अनंत ठीक, सोन्या चांदीचे प्रसिध्द व्यापारी सुहास मुसळूणकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज डाफळे, सोमनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कारेकर, प्रसिध्द डॉक्टर भावना त्रिवेदि, प्रसिद्ध वकील संदीप आग्रे, नाट्यलेखक यशवंत माणके, संकेत बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तकुमार शिगवण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुकाई देवी उज्ज्वल नाट्य मंडळ भेळेवाडी, श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच, श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ तळवली यांनी विशेष मेहनत घेतली. Response to Kanyadan drama experiment in Mumbai

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarResponse to Kanyadan drama experiment in MumbaiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.