लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे
गुहागर, ता. 06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्यावतीने गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुहागर हायस्कूल आणि अन्नपूर्णा श्रीधर वैद्य विद्यालय गुहागर मधील तीस शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Teachers felicitated at Guhagar High School

यावेळी ला. संतोष वरंडे यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपण नवीन पिढीला योग्य संस्कार देत असून भारताचा सुजाण नागरिक बनवत आहात. आपल्या हातून गुणवंत विद्यार्थी घडो, असे ते म्हणाले. यावेळी शिक्षक श्री. निलेश गोयथळे, प्राचार्य सुधाकर कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड म्हणून हायस्कूलचे प्राचार्य ला. सुधाकर कांबळे यांचे उत्तम सहकार्य लाभले. Teachers felicitated at Guhagar High School

या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष ला. संतोष वरंडे, सचिव ला. सचिन मुसळे, माजी अध्यक्ष ला. शामकांत खातू, ला. माधव ओक, ला. सुरेंद्र मर्दा, ला. नितीन बेंडल, ला. संतोष मोरे, ला. डॉ. निलेश ढेरे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मधुकर गंगावणे यांनी तर आभार सौ. सुजाता कांबळे यांनी मानले. Teachers felicitated at Guhagar High School

