गुहागर, ता. 05 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत रानवी येथे महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदिप कदम यांची सर्वानूमते एकमताने निवड करण्यात आली आहे. नूकतीच ग्रामपंचायत ग्रामसभा माजी सरपंच श्री.महेंद्र काजारे यांचे अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली. यामध्ये श्री.संदिप कदम यांची सलग ८ वेळा तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Ranavi Tantamukat Committee President Kadam

या बैठकीला सरपंच मानसी बने, उपसरपंच दिनेश बारगोडे, ग्रामविकास अधिकारी श्री.प्रक्षाले, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद चोगले, माजी सरपंच महेंद्र काजारे, सदस्य मनाली कदम, वैष्णवी बारगोडे, मयुरी चोगले, ग्रामस्थ महेंद्र कदम, सुहास चोगले, सुजाता कदम ,अनिता कदम यांचेसह महिला, पुरुष बहूसंख्येने उपस्थित होते. Ranavi Tantamukat Committee President Kadam

