• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काजुर्ली मानवाडी शाळेला ग्रामस्थांकडून मदत

by Guhagar News
September 5, 2023
in Guhagar
57 0
0
Donation to Kajurli School by Partha Pandit
112
SHARES
319
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मिशन आपुलकी योजने अंतर्गत वस्तूरुपात मदत

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शाळांसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी केले. याही वर्षी मिशन आपुलकी नावाचा एक अत्यंत समाजाभिमुख उपक्रम जिल्हा परिषद रत्नागिरीने राबवण्याचा संकल्प केला आहे. Help from Villagers to Kajurli School

या उपक्रमांतून प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि शाळा यांना समाजातील उदार देणगीदारांकडून आपल्या गरजा त्यांना समजावून सांगून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२ मानवाडी या शाळेस  ग्रामस्थांकडून विवीध प्रकारचे सहकार्य केले जाते. मानवाडी शाळेसाठी करा ओके साउंड सिस्टीम ची आवश्यकता असल्याने गावातील श्री. सुनील हुमणे, श्री. अनिल डिंगणकर, श्री. सुरज डिंगणकर, श्री.महेंद्र डिंगणकर, श्री. मोहन डिंगणकर यांनी सुमारे ९०००/- रुपये किमतीचा कराओके साउंड सिस्टीम भेट दिली.  Help from Villagers to Kajurli School

यासाठी तरुणांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सायली रेवाळे, सरपंच महोदया रुक्मिणी सुवरे, उपसरपंच सुधाकर गोणबरे तसेच सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आणि तरुणांनी शाळांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाज आणि शाळा यांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. Help from Villagers to Kajurli School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHelp from Villagers to Kajurli SchoolLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.