सावित्रीबाई फूले दत्तक पालक योजने अंतर्गत मदत
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : सावित्रीबाई फूले दत्तक पालक योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या हुशार गरजू तसेच गरीब विद्यार्थिनींना मदत होण्यासाठी ३०००/- रु. (तीन हजार रुपये) भरल्यास या रकमेच्या व्याजातून दरवर्षी शिक्षण घेणाऱ्या हुशार गरजू तसेच गरीब विद्यार्थिनींना करणे शक्य होते. या बाबींचा विचार करून श्री. पार्थ सुनील पंडित यांनी जिल्हा परिषद शाळा काजुर्ली न.२ मानवाडी या शाळेस १२०००/- रुपये देणगी दिली. Donation to Kajurli School by Partha Pandit

शाळेचे मुख्याध्यापक श्री. दशरथ रघुनाथ साळवी यांनी ही रक्कम सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना जिल्हा नीधी फंडात गटशिक्षणाधिकारी पं. स.गुहागर यांचे मार्फत जमा केले. आता या रकमेच्या व्याजातून दरवर्षी या शाळेत चार मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या दात्रुत्वासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सायली रेवाळे, काजुर्ली सरपंच श्रीमती. रुक्मिणी सुवरे, उपसरपंच, श्री.सुधाकर गोणबरे, तसेच सर्व ग्रामस्थांनी पार्थ सुनील पंडित यांना धन्यवाद दिले. ही मदत मिळवण्यासाठी श्री. दशरथ रघुनाथ साळवी यांनी विशेष प्रयत्न केले. Donation to Kajurli School by Partha Pandit


