प्रशिक्षणासाठी घेतलेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण
गुहागर, ता. 01 : नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेतलेल्या निवड चाचणी परीक्षेमध्ये आबलोलीच्या अनुज संदेश साळवी उत्तीर्ण झाला आहे. ही निवड चाचणी परीक्षा त्याने जवाहर नवोदय विद्यालय राजापूरमध्ये शिकत असताना दिली आहे. त्याच्या या यशाबद्दल स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने अनुज साळवीचा पुण्यात सत्कार करण्यात येणार आहे. Anuj from Aabloli will visit NASA
अमेरीकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाविषयी कुतहूल निर्माण व्हावे म्हणून विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जगभरातील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ व्हावा, म्हणून नासातर्फे निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने पहिल्यांदाच ही परीक्षा 26 ऑगस्टला घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील इ. 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्याचा समावेश होता. गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन या विषयावर आधारीत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्र्नपत्रिका होती. नवोदय विद्यालयात शिकणारा, गुहागर तालुक्यातील आबलोलीचा अनुप साळवी हा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याला नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे जाण्याची संधी मिळणार आहे. तसेच अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही प्रशिक्षणार्थींबरोबर फिरण्याची संधी अनुपला मिळणार आहे. अनुपच्या या अमेरिका दौऱ्याचा खर्च देखील नासा, स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्यावतीने करण्यात येणार आहे. Anuj from Aabloli will visit NASA
याबाबत बोलताना युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार म्हणाल्या की, दरवर्षी नासाद्वारे अंतराळ संशोधनातील विद्यार्थ्यांची रुची वाढावी म्हणून विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. यामध्ये जगाभरातील अनेक गुणवान विद्यार्थी सहभागी होत असतात. यावर्षी प्रथमच भारतामध्येही निवड चाचणी प्रक्रिया राबविण्यात आली. नासाच्या प्रशिक्षणामध्ये अंतराळविषयक संशोधन व प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार आहे. कु.अनुज संदेश साळवी याने मिळविलेल्या यशाबद्दल २ सप्टेंबरला पुणे येथे स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. Anuj from Aabloli will visit NASA