महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींचे आयोजन
रत्नागिरी, ता. 01 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन्स फॉर वुमेन (बीसीए) महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी “तुमची आमची सेफ्टी सर्वांची सेफ्टी” या विषयावर अतिशय उत्कृष्ट पथनाटय नुकतेच सादर केले. या पथनाटयातून विद्यार्थिंनीनी वाहतूकीचे नियमाबाबत जनजागृती केली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस दल, वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे जिल्हा न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हे पथनाट्य सादर केले. Street play on road safety in Ratnagiri

या पथनाट्याद्वारे विद्यार्थिनींनी रस्ता वाहतूक करताना घडणारे गुन्हे त्याचबरोबर गुन्हे घडू नये, म्हणून घ्यावयाची खबरदारी आणि नियम हे उत्तम अभिनयाद्वारे सादर केले. या पथनाटयामध्ये मंजिरी कांबळे, रीया धुमक, चिन्मयी पवार, निर्जरा सुर्वे, साक्षी मोरे, पूर्वा पवार, ईशा चव्हाण, आकांक्षा जोशी, आर्या दाते, आलिया म्हसकर, झोया काझी सहभागी झाल्या होत्या. सहभागी विद्यार्थिनींना कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी राहुल चौत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निखील गोसावी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पथनाटयाचे आयोजन करण्यासाठी वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांचे सहकार्य लाभले. Street play on road safety in Ratnagiri

या विद्यार्थिनींचे बीसीए महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंतदेसाई आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले. Street play on road safety in Ratnagiri

