• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरची आमसभा 8 सप्टेंबरला

by Manoj Bavdhankar
August 31, 2023
in Guhagar
174 2
0
General Meeting of Guhagar on 8th September
342
SHARES
976
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : पंचायत समिती गुहागरची आमसभा मंगळवार, दि. 8 सप्टेंबरला सकाळी 11 वा. भंडारी भवन, कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, किर्तनवाडी रस्ता, गुहागर येथे होणार आहे. ही आमसभा आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी गुहागर तालुकावासीयांनी आमसभेला उपस्थित रहावे. असे आवाहन गटविकास अधिकारी गुहागर यांनी केले आहे. General Meeting of Guhagar on 8th September

पंचायत समितीची आमसभा म्हणजे गावागावातील प्रलंबित विकास कामांमधील अडथळे सोडविण्याचा राजमार्ग असतो. आमसभेमध्ये शासनाच्या प्रत्येक खात्याचा अधिकारी उपस्थित असतो. सामान्य जनतेने दिलेल्या निवेदनाला उत्तर देणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. एकाच ठिकाणी सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित असल्याने एखाद्या प्रलंबित विकास कामातील अडथळे आमसभेमध्ये चटकन दूर होतात. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार असल्याने अधिकाऱ्यांना उडवाउडवीची, दिशाभुल करणारी उत्तरे देता येत नाहीत. कारण आमसभेतील प्रत्येक विषयाचा आढावा त्यानंतर थेट आमदार घेतात. त्यामुळे आमसभा म्हणजे दिर्घकाळ चालणारी, शेकडो निवेदनांवर चर्चा होणारी असे चित्र असते. General Meeting of Guhagar on 8th September

मात्र यावर्षी गुहागरच्या आमसभेसाठी केवळ 8 निवेदन पंचायत समितीकडे प्राप्त झाली आहेत. यामधील 4 निवेदने रस्त्यासंदर्भातील, 1 महावितरण, 1 आरोग्य विभाग, 2 कृषी विभागाशी संबंधित आहे. राज्यातील राजकारणामध्ये झालेल्या उलटफेरांमुळे निवेदनांचा दुष्काळ असल्याची चर्चा सध्या गुहागरमध्ये होत आहे.  General Meeting of Guhagar on 8th September

Tags: General Meeting of Guhagar on 8th SeptemberGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.