• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची रक्षाबंधननिमित्त भेट

by Ganesh Dhanawade
August 31, 2023
in Guhagar
81 1
3
Computer training for students at low cost

संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ करताना साहील आरेकर, राहुल सावंत, प्रणिता घाडगे व रितेश कोतवडेकर

160
SHARES
457
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात संगणक प्रशिक्षण

गुहागर, ता. 31 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अल्पदरात संगणक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही रक्षाबंधननिमित्त भेट दिली आहे. या उपक्रमामध्ये 4 हजार 500 रु. फी असलेले संगणक अभ्यासक्रम केवळ 1900 रुपयांत शिकता येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष साहील आरेकर यांनी दिली आहे. Computer training for students at low cost

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष साहील आरेकर यांच्या हस्ते रक्षाबंधन दिनी चिपळूणमध्ये झाला. या अभियाना अंतर्गत दिशा संगणक केंद्रातर्फे (Disha Computer Center) रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात संगणक प्रशिक्षण घेता येणार आहे. यामध्ये फोटोशॉप, कोरलड्रॉ, अकौंटींग, टॅली प्राईम, प्रोग्रामिंग, सी व सी ++, ॲडव्हान्स एक्सेल, एमएस ऑफीस, ग्राफीक्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमाची फी 4 हजार 500 इतकी होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अभियानाअंतर्गत कोणताही एक अभ्यासक्रम केवळ 1 हजार 900 रु. फी भरुन शिकता येणार आहे. हे अभियान 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2023 या महिनाभराच्या कालावधीत सुरु रहाणार आहे. Computer training for students at low cost

या अभियानाअंर्गत प्रवेश घेण्यासाठी रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 8421551239, चिपळूण संगमेश्र्वर व खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 7276865033 आणि गुहागर, दापोली व मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 8262013033 या क्रमांकावर संपर्क साधावा.  एकाच कॉलमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरुन ऑनलाइन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थ्याकडून 1900 रु. फी जमा झाल्यावर दिशा संगणक प्रशिक्षण केंद्राद्वारे त्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पध्दतीने प्रशिक्षण सुरु होणार आहे. Computer training for students at low cost

याबाबत बोलताना रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहील आरेकर म्हणाले की, रक्षाबंधन निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्याना आम्ही ही आगळीवेगळी भेट देत आहोत. प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची उर्वरित फी संघटनेतर्फे भरली जाणार आहे. या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाला दिशा संगणक केंद्राचे संचालक रितेश कोतवडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सावंत, राष्‍ट्रवादी युवती जिल्‍हा सचिव प्रणिता घाडगे,  ओंकार पटवर्धन, संकेत चाळके आदी उपस्थित होते. Computer training for students at low cost

Tags: ComputerComputer training for students at low costDisha Computer CenterGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.