• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नेवरे येथे नारळ रोपांचे वाटप

by Guhagar News
August 31, 2023
in Ratnagiri
65 1
0
Distribution of coconut saplings at Nevare
127
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

रत्नागिरी, ता. 31 : येथील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त नेवरे येथे नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नेवरे येथील न्यू इंग्लिश स्कूल व मीनाताई ठाकरे ज्युनिअर कॉलेजमध्ये झाला. Distribution of coconut saplings at Nevare

Distribution of coconut saplings at Nevare

ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त ट्रस्टचे संस्थापक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे मुळ गाव नेवरे (ता. जि. रत्नागिरी) हे असल्यामुळे ट्रस्टच्या वतीने नेवरे येथे फळरोप वाटप कार्यक्रमाअंतर्गत नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ व विद्यार्थी यांना शंभर नारळ रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमात माजी कृषीविद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यांनी नारळ रोपांची लागवड व निगा या विषयी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. ट्रस्टचे संस्थापक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या जीवन चरित्राची माहिती प्रा. श्रीमती जयश्री बर्वे यांनी दिली. Distribution of coconut saplings at Nevare

न्यू इंग्लिश स्कूल व मीनाताई ठाकरे ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष, माजी पं. स. सभापती उत्तम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदिप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी, पांडुरंग पेठे, ट्रस्टी बाळकृष्ण शेलार, व्यवस्था समिती अध्यक्ष गजानन चाळके, नेवरे गावचे सरपंच दीपक फणसे, नंदुशेठ खेर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद, नेवरे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी सभापती उत्तम मोरे व सरपंच दीपक फणसे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य मिळाले. Distribution of coconut saplings at Nevare

Tags: Distribution of coconut saplings at NevareGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.