गुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथील बीबीए (बॅचलर ऑफ बिजनेस अॅडमिनीस्ट्रेशन) (Bachelor of Business Administration) विभागाचे विद्यार्थी आणि प्रा. शाहरुख चौगले यांनी ‘मालाणी मार्ट’ शृंगारतळीला मंगळवारी प्रत्यक्ष भेट दिली. Regal students visited Malani Mart


या व्यवसाय भेटीमध्ये व्यवसायाचे नियोजन कसे करावे, व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे, कर्मचारी नियोजन कसे कसे करावे, मार्ट करिता खरेदी व विक्री यांचे व्यवस्थापन कसे करावे. तसेच ग्राहकांसोबत संबंध कसे जोपासावे या संदर्भात माहिती देण्यात आली. सदर व्यवसाय भेटीची सुरुवात विद्यार्थ्यांना मार्टमधील प्रत्येक वस्तूंच्या विभागाची माहिती दिली. यामध्ये सुरुवातीला धान्य, तेल, बेकरी प्रोडक्टस इ.चे प्रत्यक्ष मांडणी दाखवून माहिती देण्यात आली. त्यानंतर संग्रहण विभागाला (गोडाऊन)भेट देण्यात आली. यामध्ये तांदूळ, गहू संग्रहण विभाग, गुळ संग्रहण, मीठ संग्रहण, कांदा संग्रहण व वातानुकुलीत संग्रहाची माहिती देण्यात आली. अकाऊंट विभाग, आणि गृहपयोगी वस्तूंच्या विभागाला भेट देण्यात आली. Regal students visited Malani Mart


यानंतर मालाणी मार्टचे मालक श्री. नदीम मालाणी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मालाणी मार्टची सुरुवात कशी केली. मार्ट सुरु करण्याबाबत निर्णय कसा घेतला, तसेच सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना व्यवसायाचे नियोजन कसे करावे. व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे व व्यवसायाचे महत्व पटवून दिले. त्यांनी अनेक प्रेरणादायी मुद्दे मुलांना सांगितले. ज्यातून मुलांना व्यवसाय कशा प्रकारे करावे, व्यवसाय का करावा, त्याचप्रमाणे यशस्वी व्यावसायिक कसे बनावे यांचे मार्गदर्शन केले. Regal students visited Malani Mart


यावेळी यानंतर प्रा. शाहरुख चौगले यांनी श्री. नदीम मालाणी यांचे आभार मानले. या भेटीचे आयोजन करण्यामध्ये रिगल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे आणि BBA विभागाचे सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. Regal students visited Malani Mart