कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवली, कोनकर सरांचा कोकणरत्न म्हणून सन्मान
डोंबिवली, ता. 30 : डोंबिवलीतील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) सायंकाळी डोंबिवली (पश्चिम) येथील महात्मा फुले रस्त्यावरील मराठा हितवर्धक मंडळ हॉलमध्ये पार पडला. Konkanbhushan award to Thakurdesai

डोंबिवलीत कोकण युवा प्रतिष्ठानची स्थापना २०१२ मध्ये झाली. प्रतिष्ठानतर्फे २०१३ मध्ये बाबासाहेब पुरंदरे लिखित “शिवकल्याण राजा” या नाट्याचा प्रयोग सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला. ठाकुर्ली येथील मातृकृपा इमारत दुर्घटनाग्रस्तांना कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने डोंबिवली, “सायक्लोथॉन” सायकल स्पर्धेचे आयोजन केले जाते. चिपळूण पूरग्रस्तांना संस्थेने मदतीचा हात दिला. दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबविला जातो. वृक्षारोपणाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक, दूरदर्शन मालिका क्षेत्रातील सुनील बर्वे, आनंद इंगळे, भाऊ कदम, समीर चौगुले, कुशल बद्रिके इत्यादींच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाते. परंपरा, संस्कृती जपली जावी या उद्देशाने गेली सात वर्षे भजनोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी या कार्यक्रमाला वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. याशिवाय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातात. Konkanbhushan award to Thakurdesai

यावर्षी मुंबई आणि रत्नागिरीसह कोकणात अत्याधुनिक नेत्रोपचारांची सुविधा असलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलची साखळी निर्माण करणारे डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांना कोकणभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच रत्नागिरीमधील पत्रकार प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न (पत्रकारिता) पुरस्कार देण्यात आला. यांच्याबरोबरच कै. गोपाळराव नारायण राणे (मरणोत्तर) यांना कोकण समाजभूषण, कै. नितीन चंद्रकांत देसाई (मरणोत्तर) यांना कोकण कलायोगी, प्रभाकर मोरे यांना कोकण कलारत्न, अशोक लोटणकर यांना कोकण साहित्यरत्न, सुनील कदम व गौरी सुरेश सावंत यांना कोकण समाजरत्न, महेंद्र साळवी व सुप्रिया सावंत यांना कोकण शिक्षणरत्न, सचिन आणि समीर अधिकारी यांना कोकण कृषिरत्न, राहुल जाधव यांना कोकण क्रीडारत्न, – शिवाजी बने यांना कोकण शौर्यरत्न आणि विशाल जाधव यांना कोकण उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Konkanbhushan award to Thakurdesai

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूरचे आमदार राजन साळवी, पद्मश्री गजानन माने, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे निवृत्त सचिव चंद्रकांत माने, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, माजी परिवहन सभापती राजेश कदम, माजी नगरसेवक नंदू धुळे मालवणकर, प्रा. डॉ. विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. Konkanbhushan award to Thakurdesai
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. बक्षीस वितरण व पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन दिनेश मोरे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. Konkanbhushan award to Thakurdesai
