मुख्यमंत्री शिंदे, शिवसेना नेते रामदारभाई व पालकमंत्री सामंत यांना दिर्घायुष्यासाठी घातले साकडे
गुहागर, ता. 29 : श्रावण सोमवारचे औचित्य साधुन गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर, खेड व चिपळुण या तिन्ही तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने शहरातील जागृत देवस्थान श्रीदेव व्याडेश्वराला एकत्रितपणे अभिषेक करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री शिंदे, शिवसेना नेते रामदारभाई कदम व पालकमंत्री उदय सामंत यांच्या दिर्घायुष्यासाठी साकडे घातले गेले. Abhishek to Vyadeshwar by Shiv Sainiks

यावेळी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून गुहागर मतदार संघाचा सर्वांगीण विकास होवू दे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदारभाई कदम व पालकमंत्री उदय सामत यांना उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातुन सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा घडो अशी प्रार्थना शिवसैनिकांकडुन करण्यात आली. Abhishek to Vyadeshwar by Shiv Sainiks

यावेळी जिल्हाप्रमुख शशिभाई चव्हाण, युवा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विराज म्हामुणकर, जिल्हा युवा समन्वयक सोहेल बामणे, तालुका प्रमुख खेड अरविंद चव्हाण, तालुका प्रमुख चिपळूण शरद शिगवण, तालुका प्रमुख गुहागर दिपक कनगुटकर, युवासेना खेड तालुका प्रमुख सुरज रेवणे, उपतालुका प्रमुख खेड संदिप आंब्रे, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख संचित काते, युवासेना जिल्हा संघटक अमरदिप परचुरे, गुहागर सचिव संतोष आग्रे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, तालुका समन्वयक नारायण गुरव, गुहागर विधानसभा युवासेना निरीक्षक अनुराग उत्तेकर, युवासेना तालुका प्रमुख रोहन भोसले, आनंद भोजने, युवा सेना सचिव सागर गुजर आदींसह गावागावातुन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी- माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. Abhishek to Vyadeshwar by Shiv Sainiks
