स्कूलच्या संघाची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
गुहागर, ता. 29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा न्यु इंग्लिश हायस्कूल पाटपन्हाळे येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. Bal Bharti Public School’s success in chess competition


बाल भारती पब्लिक स्कूलचे १४ वर्षाखालील (मुले) गटामध्ये कु. आर्यन कोलवणकर – प्रथम, कु. आर सात्विक – द्वितीय, कु. आदन अडोनोल – तुतीय व कु. प्रथम गजभिये पाचवे स्थान तर १४ वर्षाखालील (मुली) कु. विदिता पांड्ये – चौथ्ये व कु. आवरिता भारद्वाज – पाचवे स्थान पटकावून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाण्याचा मान मिळवला. १७ वर्षाखालील (मुले) कु. अर्णव तोडकरी – प्रथम, कु. शिवराज दाभोळकर – तिसरे, कु. वरद फुणगुस्कर- चौथ्ये व कु. आर्यन चव्हाण – पाचवे स्थान तर १७ वर्षाखालील (मुली) कु. तनया खानविलकर – प्रथम व कु. आयेशा खतीब – तिसरे स्थान पटकावून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाण्याचा मान मिळवला. स्कूलच्या संघाचीही शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. Bal Bharti Public School’s success in chess competition


या संघांना श्री. नविंदर लखनपाल यांचे मार्गदर्शन लाभले. बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याच्या समवेत प्राचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले. Bal Bharti Public School’s success in chess competition