गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागरच्या युवक प्रमुखपदी अडूर येथील दिनेश दिपक झगडे यांची निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे वेळंब येथील युवक अध्यक्ष पदी प्रितम रहाटे होते. त्यांचा कार्यकाळ संपल्याने रविवारी दि. २७ रोजी तेली समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिनेश झगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. Taluka Teli Samaj Youth Chief Jagade

दिनेश झगडे हे भाजपा ओबीसी मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमचे गुहागर तालुका अध्यक्ष आहेत. त्यांनी अनेक गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्या टीमच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल मध्ये मदत केली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा अनेक गरीब गरजू रुग्णांना तेथील वैद्यकीय सेवेमध्ये मदत केली आहे. हे त्यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना गुहागर तालुका तेली समाजसेवा संघ गुहागर या संघटनेच्या वतीने गुहागर तालुका युवक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. Taluka Teli Samaj Youth Chief Jagade

यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष प्रकाश झगडे, उपाध्यक्ष गजानन जाधव, सचिव प्रवीण रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, खजिनदार विश्वनाथ रहाटे, माजी अध्यक्ष एकनाथ रहाटे, शशिकांत पवार, अनिल रहाटे, महिला तालुकाध्यक्ष दिव्या किर्वे, माजी युवक अध्यक्ष प्रीतम रहाटे व सर्व समाजातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. Taluka Teli Samaj Youth Chief Jagade
