गुहागर, ता. 29 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला (Maharishi Parashuram College of Engineering, Varaneswar) जपान देशातील २२ विद्यार्थी आणि त्यांचे २ अध्यापक यांनी भेट दिली. ठाण्यातील नामांकित शिक्षण संस्था विद्या प्रसारक मंडळ हे जगभराच्या शैक्षणिक ज्ञानाच्या आदान-प्रदानाचे एक आधुनिक आणि सुसज्ज केंद्र असल्यामुळे ठाण्यात या संस्थेला परदेशातील कितीतरी विद्यार्थी सतत भेटी देत असतात. Students’ visit to Maharishi Parashuram College

यावेळी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून या जपानी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपले कोकण, कोकणातील स्थानिक सणवार, रीती-रिवाज, मराठी संस्कृती आणि भारतीय परंपरा यांचे ओझरते दर्शन या विद्यार्थ्यांना करून देण्याचा महाविद्यालयाने एक स्तुत्य आणि उत्कृष्ट उपक्रम प्रभावीपणे राबवला. Students’ visit to Maharishi Parashuram College

सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता झाली. यावेळी सर्वप्रथम जपानी विद्यार्थ्यांना रांगोळी म्हणजे काय हे जपानी भाषेतूनच सांगण्यात आलं आणि त्यांना सर्वांना रांगोळी काढायला शिकवली गेली. महाविद्यालयातीलच विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका त्यांना रांगोळी शिकवण्यात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. जपानी विद्यार्थ्यांनीही यावेळी रांगोळी काढण्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर त्यांना कोकणातला गणेशोत्सव दाखवला गेला. स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गणपतीची पार्थिव मूर्ती घेऊन अगदी वाजतगाजत मिरवणूक काढली, आरत्या केल्या, प्रसादवाटप केले. त्यानंतर विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पालखीनृत्य सादर केले. अशा प्रकारे कोकणातले दोन मोठे उत्सव ‘गणपती’ आणि ‘शिमगा’ यांचे ओझरते पण सुंदर दर्शन यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना घडवले. Students’ visit to Maharishi Parashuram College

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यानंतर कॉलेजमधील स्त्री स्टाफ कर्मचाऱ्यांनी पारंपरिक मंगळागौर सादर केली. त्यालाही उपस्थितांची उत्तम वाहवा मिळाली. त्यानंतर मीराभजन, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती (जय देव जय देव जय जय शिवराया), मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशी एकापेक्षा एक सुरेल गाणी महाविद्यालयाच्या अध्यापकवृंदांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्थापत्य अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने यावेळी राष्ट्रभक्तीपर स्वलिखित काव्य वाचन केले. त्या काव्याचा जपानी अर्थ सुद्धा सांगण्यात आला. त्यानंतर जपानी विद्यार्थ्यांनीही एका जपानी गाण्यावर नृत्याविष्कार सादर करून या कार्यक्रमावर यशस्वीततेचा कळस चढवला. कार्यक्रमाची सांगता “कैसे वेड लाविले या हरीने मन मोहिले” या भैरवीने झाली. Students’ visit to Maharishi Parashuram College

एकूणच या सगळ्या उपक्रमांमुळे सर्व जपानी विद्यार्थी कमालीचे भारावून गेले होते. प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, डॉ. सुधाकर आगरकर (ठाणे), महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी सतत काहीतरी नवनवीन उपक्रम राबवण्यात वेळणेश्वरचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय कायमच अग्रेसर राहिलेलं आहे. पण यावेळी परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना इथल्या स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्याचा महाविद्यालयाचा हा उपक्रम फारच वेगळा आणि अभिनंदनास पात्र ठरतो आहे. Students’ visit to Maharishi Parashuram College
