गुहागर, ता. 27 : सोमवार, दिनांक १४ ऑगस्ट,२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त (१२/०८/२०२३) रेड रिबन क्लब रत्नागिरी जिल्हा व खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि हेल्थ केअर विभागाच्या संयुक्तविद्यमाने “एड्स जनजागृती उपक्रम” संपन्न झाला. यावेळी गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश ढेरे यांचे ‘एड्स जनजागृती युवा पिढीची भूमिका’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “AIDS Awareness Activities” completed in KDB College


कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.निळकंठ भालेराव यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश, युवकांमधील जनजागृतीद्वारे समाजामध्ये जनजागृतीची प्रक्रिया राबवणे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आनंद कांबळे यांनी प्रमुख पाहुणे डॉ. निलेश ढेरे यांची ओळख करून दिली. डॉ.निलेश ढेरे यांनी आपल्या व्याख्यानातून एड्स हा एक व्यापक रोग असून तो HIV या विषाणूमुळे होतो. तो रक्ताद्वारे मानवी शरीरात प्रवेश करून रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला करतो. याची वैशिष्ट्य म्हणजे हा आपली रचना सतत बदलत असल्याने या रोगावर आजही पूर्णतः उपाय नसल्याचे स्पष्ट केले. “AIDS Awareness Activities” completed in KDB College


या रोगासाठी प्रतिबंध उपाय म्हणून सुरक्षित यौन संबंध ठेवणे, शरीरावर टॅटू काढताना काळजी घेणे, रक्तदान करताना व रक्त घेताना योग्यती काळजी घेण्याविषयी सूचित केले. समाजातील एड्सग्रस्त व्यक्तीबाबत सरकारतर्फे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाद्वारे (NACP) करण्यात येणारे उपाय योजनाही सांगितल्या. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण बाधितांपैकी ४०% बाधित हे तरुण वर्गातील असल्याचे स्पष्ट केले. म्हणून तरुणांच्या पासून जनजागृतीची सुरुवात करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. त्याचबरोबर लग्न करताना एड्स चाचणीदेखील करण्याचा आग्रह युवापिढीने धरण्याविषयी आवाहन केले. “AIDS Awareness Activities” completed in KDB College


व्याख्यानानंतर एड्स जनजागृतीसंबंधी विविध विषयांवर आधारित पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ.निलेश ढेरे, प्रभारी प्राचार्य प्रा.श्री.पद्मनाभ सरपोतदार यांच्या हस्ते सिद्धिविनायक भवन येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अखेरीस पोस्टर प्रदर्शनाच्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. या पोस्टर प्रदर्शनातील प्रथम क्रमांक–कु.सानिका मोरे व समृद्धी जाधव, द्वितीय क्रमांक-प्राजक्ता मांडके व सानिका असगोलकर, तृतीय क्रमांक-तन्वी आग्रे व रिंकल आग्रे, उत्तेजनार्थ– ऋतिका अलगोलकर व वैष्णवी पावस्कर आणि मानस वेल्हाळ व वैष्णवी दणदणे इ. विद्यार्थ्यांनी मिळवला. “AIDS Awareness Activities” completed in KDB College


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रामेश्वर सोळंके यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.अनिल हिंरगोंड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.संतोष जाधव, प्रा.गोविंद सानप, प्रा.प्रमोद आगळे, प्रा.सौ.रश्मी आडेकर व कर्मचारी वर्ग यांनी सहयोग नोंदवला. सदर कार्यक्रमाला एनएसएस विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते व पोस्टर प्रदर्शनाचा लाभ वरिष्ठ महाविद्यालयाबरोबरच कनिष्ठ महाविद्यालयातील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी घेतला. “AIDS Awareness Activities” completed in KDB College