• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप

by Ganesh Dhanawade
August 26, 2023
in Guhagar
68 0
0
Free glasses distribution to school students
133
SHARES
379
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लायन्स क्लब ऑफ गुहागर आयोजित

गुहागर, ता. 26 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या मार्फत उद्या दिनांक 27 रोजी सकाळी 10.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री देव व्याडेश्वर मंदिराच्या परशुराम सभागृह गुहागर येथे घेण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, चिपळूण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. तुषार गोखले, डॉ दिनेश जोशी उपस्थित राहणार आहेत. Free glasses distribution to school students

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध समाजोयोगी उपक्रम राबविले आहेत. कर्तुत्ववान महिलांचा सन्मान, वृक्षारोपण कार्यक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला यांची आरोग्य तपासणी शिबिर घेतले. समाजातील प्रत्येक घटकाला सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी चष्मा वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे सदस्य ला. सुरेंद्र मर्दा व ला. मनीष खरे यांनी मोफत चष्मा देण्याचा खर्च उचलला आहे. तसेच अल्पोउपरसाठी ला. रवींद्र खरे यांनी आर्थिक सहकार्य केले आहे.  Free glasses distribution to school students

तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे, सेक्रेटरी सचिन मुसळे, खजिनदार मनिष खरे तसेच सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले आहे. Free glasses distribution to school students

Tags: Free glasses distribution to school studentsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLions ClubMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालायन्स क्लबलोकल न्युज
Share53SendTweet33
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.