• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या विनयभंगाची तक्रार

by Mayuresh Patnakar
August 26, 2023
in Guhagar
235 2
0
Gram Panchayat has the right to give work to whom
461
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरटीआय कार्यकर्त्याने शासकीय कामात आणला अडथळा

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सौ. सुलभा बडद यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात विनयभंग आणि शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. या कार्यकर्त्याचे नाव जावेद केळकर आहे. ग्रामपंचायत पाटपन्हाळेत माहितीच्या अधिकारात सर्वाधिक अर्ज करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. Complaint of molestation by Gram Vikas Officer

सुलभा बडद यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 24 ऑगस्टला दुपारी 1.30 च्या सुमारास पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमधील सरपंच कक्षात जलजीवन मिशनच्या कामात मिटींग सुरु होती. यावेळी सरपंच विजय तेलगडे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश राऊत, ग्रामस्थ मनिष चव्हाण, प्रियाल चव्हाण व स्वत: सुलभा बडद नळपाणी योजने संदर्भात चर्चा करत होते. त्यावेळी जावेद केळकर, रा. शृंगारतळी यांनी सरपंच कक्षाचा दरवाजा उघडून सुलभा बडद यांना बोलावून माहिती देण्यास सांगितले. त्यावर सरपंच उपस्थित असल्याने आपण येथेच चर्चा करु असे सौ. बडद यांनी सांगितले. त्यावेळी सरपंच साहेबांचा याच्याशी काही संबंध नाही. तु मला माहीती देणे बंधनकारक आहे. अशा शब्दात केळकर यांनी पुन्हा बडद यांना बाहेर येण्यास सांगितले. अखेर सौ. बडद यांनी तुम्ही माहितीच्या अधिकारात विचारत असलेली माहिती नागरी सुविधेच्या निविदाचे ठेकेदार यांच्याशी निगडीत असल्याने ती तुम्हाला देता येणार नाही. असे सौ. बडद यांनी सांगितले. या उत्तराने संतापलेल्या जावेद केळकर यांनी तु  कायदा शिकवु नको. वरिष्ठांकडे तक्रार करेन. एकही काम करत नाहीस. वारंवार फेऱ्या मारायला लावतेस. तुला आता धंद्याला लावतो. असे मोठ्याने बोलत सौ. बडद यांना आईवरुन शिविगाळ केली. तसेच धमकीही दिली. Complaint of molestation by Gram Vikas Officer

जावेद केळकर हे नेहमीच गावातील विकास कामांबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये येवून वारंवार मला त्रास देतात. माझ्या वैयक्तिक फोनवर फोन करतात. माझ्या कामात अडथळा आणतात. दमदाटी करतात. असेही सौ. सुलभा बडद यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन गुहागर पोलीसांनी जावेद केळकर यांच्याविरुध्द विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा नोंदविला आहे.  Complaint of molestation by Gram Vikas Officer

Tags: Complaint of molestation by Gram Vikas OfficerGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share184SendTweet115
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.