गुहागर, ता. 25 : घरी कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृतदेह जंगलात झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना वडद डफळेवाडी येथे घडली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. Dead body hanging from a tree in Vadad

वडद डफळेवाडी येथील राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजाराम घरातून कोणालाही न सांगता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याची शोधाशोध सगळीकडे सुरू होती. त्याचा ठावठिकाणा कुणीकडेच लागला नव्हता. अखेर १७ ऑगस्ट रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह सात दिवसांनी थेट जंगलात झाडाला टांगलेल्या स्थितीत सापडून आल्याने सर्वांच धक्का बसला आहे. Dead body hanging from a tree in Vadad

