गुहागर, ता. 25 : मासू ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीची नुकतीच निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बहुतांशी शासकीय योजनांची माहिती असणारे श्री. विजय मसुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Masurkar as chairman of Masu Tantamukt Samiti

श्री. विजय मसुरकर यांनी आपला गाव, पंचक्रोशी तसेच तालुक्यात गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आपल्या गावातील ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक (ग्रामीण) याचेही ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर व रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समिती यावरही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अशा शांत सय्यमी व अभ्यासू व्यक्तीचा गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंचक्रोशीतुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Masurkar as chairman of Masu Tantamukt Samiti

