पाचेरी सडा येथील श्रद्धा गणेश चित्र शाळेत रंगल्या गणेशाच्या मुर्त्या
संदेश कदम
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाचेरी सडा गावचे सूपुत्र, गणेश मुर्तीकार श्री.दिपक गणपत आंब्रे यांच्या श्रद्धा गणेश चित्र शाळेत श्री.गणेशाच्या सुंदर रेखीव आकर्षक मुर्त्या रंगल्या आहेत. अनेक वर्षाची गणेश मूर्त्या साकारण्याची व सुबक आणि आकर्षक रंगकामाची यशस्वी परंपरा आंब्रे घराण्याने जपली असून आज तिस-या पिढीने ही यशस्वी परंपरा आणि घौडदौड कायम ठेवली आहे. A tradition preserved by the Ambre family

श्री.दिपक आंब्रे यांच्या श्रद्धा गणेश चित्र शाळेत त्यांच्या हस्त कौशल्यातून साकारलेल्या शाडू मातीतील बाप्पांच्या सुंदर रेखीव आकर्षक मुर्त्या पहायला मिळतात. यांनी आपल्या गणपती कलेचे शिक्षण त्यांचे काका श्री.भिकाजी आंब्रे यांचेकडून घेतले असून श्री.दिपक आंब्रे यांनी हि कला स्वत:पूरती न ठेवता ग्रामिण भागातून अनेक शिष्य घडवीले असून त्यांचे स्वतंत्र गणपती कारखाने आहेत. दिपक आंब्रे यांचे चिरंजीव कु.आशिष आंब्रे यांनीही आपल्या वडिलांचा गणेश मुर्ती साकारण्याचा वसा अंगिकारला असून वडिलांना तो या कामात मदत करतो. A tradition preserved by the Ambre family

आशिषने सावर्डे येथे ५ वर्षे “फाईन आर्टचे” शिक्षण घेतले असून गणपती बाप्पाच्या कलेत माहिर असून वेगवेगळ्या प्रकारची गणपती मूर्तींची पेंटींग त्याच्या हस्त कलेतून पहायला मिळते. श्रद्धा गणेश चित्र शाळेत ८ इंचा पासून ते ६,७ फूटां पर्यंत बाप्पांच्या मूर्त्या पहायला मिळतात यामध्ये आशिष याने बनविलेल्या मुर्त्यामध्ये सव्वा तीन फूट उंचीची परमपूज्य श्री.स्वामी गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीसह लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई अशा विवीध प्रकारच्या मूर्त्या व बालमूर्त्या पहायला मिळतात. A tradition preserved by the Ambre family

या गणेश मुर्त्यांना फक्त गावातच नाहितर गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्याच्या बाहेरही मोठी मागणी असते. या चित्र शाळेला पाचेरी सडा परिसरातील शाळा, हायस्कूलचे विद्यार्थी दरवर्षी भेट देतात. मूर्ती कशी बनविली जाते व कशी रंगवली जाते, रंग कसे तयार केले जातात याची सविस्तर माहिती त्यांनाआशिष सांगत असतो. या श्रद्धा गणेश चित्र शाळेत ५००/- रूपयांपासून १२०००/- रूपये, ते १३०००/- किमतींच्या मूर्ती विक्रिसाठी उपलब्ध आहेत. A tradition preserved by the Ambre family

