महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानीत
संदेश कदम
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोलीचा सूपुत्र आणि प्रगतशील शेतकरी, SK4 हळदीच्या वाणाचे जनक श्री. सचिन कमळाकर कारेकर यांना नवरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांचे वतीने नाम. जगन्नाथ तथा नाना शंकशेठ यांचे १५८ व्या पुण्यस्मरण व अभिवादन कार्यक्रमानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांचे हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. Navratna Award to Sachin Karekar of Aabloli


यावेळी चित्रा ताई वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. मी स्वतः २४ कँरेट असल्याचे म्हणजे सोनार असल्याचे सांगितले. आणि नाना शंकर शेठ यांचे स्मारक उभारण्यासाठी तसेच रेल्वे स्टेशनला नानांचे नाव देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून ते पूर्ण करू असेही सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. सुरेन्द्र शंकर शेठ (नाना शंकर शेठ यांचे पुतणे), यांचे प्रमुख उपस्थितीत व अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी आदि. पदाधिकारी व दैवज्ञ समाज बांधवांचे उपस्थितीत उत्साहात पार पडला. Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

