• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फळबाग योजनेंतर्गत खतांसाठी १००% अनुदान

by Guhagar News
August 23, 2023
in Bharat
81 1
0
Subsidy for Fertilizers under Orchard Scheme
160
SHARES
457
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई, ता. 23 : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. Subsidy for Fertilizers under Orchard Scheme

 फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील दिली आहे. Subsidy for Fertilizers under Orchard Scheme

राज्य सरकारने ०६ जुलै, २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून या अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. Subsidy for Fertilizers under Orchard Scheme

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSubsidy for Fertilizers under Orchard SchemeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.