• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तेली समाज सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
August 23, 2023
in Ratnagiri
133 2
0
Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

निवृत्त जिल्हा न्यायाधीश व कायदे सल्लागार डी. एस. जामखेडकर यांचा सत्कार करताना.

262
SHARES
748
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आणि उपशाखा रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश व कायदे सल्लागार डी. एस. जामखेडकर उपस्थित होते. Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, राज्य उपाध्यक्ष गणपतीपुळे देवस्थान अध्यक्ष विनायक राऊत, कोकण विभाग सचिव चंद्रकांत झगडे, कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे, व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा तयारी यासाठी प्रमुख मार्गदर्शक संदेश पांडुरंग रहाटे, जि. प. रत्नागिरीचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे आदी उपस्थित होते. या गुणगौरव कार्यक्रमात विनायक राऊत (रत्नागिरी,) चंद्रकांत झगडे (गुहागर), विनोद झगडे (चिपळूण), सतीश वैरागी (पनवेल), जिल्हा रायगड, संदेश रहाटे (रत्नागिरी), कार्याध्यक्ष दिपक राऊत, प्रमुख पाहुणे डी. एस. जामखेडकर, जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी गुणवंताना मार्गदर्शन केले. Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी संगमेश्वर तालुकाध्यक्ष संतोष पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वधुवर मंडळ स्थापन करण्यात आले. २४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वधुवर मेळावा आयोजित करावयाचा असुन जास्तीत जास्त वधुवरांपर्यंत पोहचून माहीती संकलीत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी समाजभवन निर्माण करणे का आवश्यक आहे हे समजावून देताना रुपये ५०००/- वर देणगी देणाऱ्यांची नावे देणगीच्या क्रमाने घेतली जातील तर रुपये ५,००,०००/- लाखाच्यावर देणगी देणाऱ्यांचे वास्तूमध्ये एखाद्या भागाला कायमस्वरुपी नाव देता येईल. Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुणवंताचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी समाजातील इयत्ता दुसरी पासुन शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक काम इत्यादी सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक काम करुन आपल्या कतृत्वाचा ठसा उमटविणारे १३० समाज बंधुभगिनींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ, सर्व तालुका अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी तसेच रत्नागिरी तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, संताजी जगनाडे महाराज सहकारी पतपेढीचे संचालक व सर्व कर्मचारी, रत्नागिरी शहर व परिसर महीला मंडळ या सर्वांनी अतिशय मेहनत घेतली. Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर व सौ. प्रज्ञा कदम यांनी केले. तर या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन जिल्हा सचिव संदीप पवार, तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, तालुकाध्यक्ष चिपळूण श्रीकृष्ण (बापू) राऊत, तालुकाध्यक्ष संगमेश्वर संतोष पावसकर, प्रकाश झगडे (गुहागर), राजेश झगडे (दापोली), सुधाकर करलकर (लांजा), विद्याधर राणे (राजापूर), रविद्र सकपाळ, वसंत सकपाळ आडीवरे (राजापूर), रत्नागिरीचे कार्याध्यक्ष बबलू कोतवडेकर, सचिव रुपेश शेलार, खजिनदार प्रविण पावसकर, सहसचिव राकेश आंब्रे, वधुवर मंडळ सदस्य प्रमोद भडकमकर, मनोहर कोतवडेकर, मकरंद पावसकर, शहराध्यक्ष अमोल लांजेकर, मंदार आंब्रे, मंदार कदम, मंगेश शेट्ये, निलेश कोतवडेकर, संदीप कर्लेकर, भाई राऊत, प्रदीप हरचिरकर, काशिनाथ सकपाळ, अनंत भडकमकर, तुषार पुनसकर, सुदाम आंब्रे, माजी जिल्हाध्यक्ष विजय पुनसकर, बिपिन बंदरकर, कल्पना लांजेकर, मंदार कदम, संतोष शेट्ये, राजेंद्र रसाळ, प्रविण राऊत, प्रदीप आंब्रे, स्वनिल सकपाळ आदींनी मेहनत घेतली. Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMeritorious felicitated by Teli Samaj Seva SanghNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share105SendTweet66
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.