समाज आणि विद्यार्थी यांचे नाते एकच असले पाहिजे – राजेश बेंडल
गुहागर, ता. 22 : समाज जीवनात आपण ज्या क्षेतात वावरतो, त्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान आपण अवगत केले पाहिजे. सामाजिक क्षेत्रात अनेकजण आपले खच्चिकरण करत असतात. आपल्या कार्यात अडथळे आणत असतात. त्यांचे न ऐकता आपण निवडलेला मार्ग आणि आपली धेय्य जर निश्चित असतील तर आपण योग्य दिशेने योग्य मार्गावरून जात आहोत, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले. Kunbi students’ felicitation ceremony concluded

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे गुहागर बाजार भवन येथील लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब सभागृहात कुणबी समाजातील विद्यार्थांचा सत्कार सोहळा व गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. Kunbi students’ felicitation ceremony concluded
श्री. बेंडल पुढे म्हणाले की, आई – वडिल आणि समाज यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवावी आणि मार्गक्रमण करावे. लोकनेते, स्व. रामभाऊ बेंडल साहेबांनी त्यांच्या ऊभ्या आयुष्यात फक्त समाजाचा विकास हाच ध्यास घेत प्रेरणादायी कार्य केले. बेंडल साहेबांच्या काळात त्यांनी समाज हितासाठी जे- जे करून ठेवले आहे, त्याचे आपण जतन केले पाहिजे आणि ते प्रेरणादायी विचार अंगिकारून आपणहि समाजहितासाठी झटले पाहिजे. समाज आणि विद्यार्थी यांचे नाते एकच असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. Kunbi students’ felicitation ceremony concluded
यावेळी इयत्ता १० वी, १२ वी व पदविधर, पदव्युत्तर विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीणचे सरचिटणीस श्री. तुकाराम निवाते यांनी तर पतसंस्थेचे संचालक श्री. अनंत पागडे यांनी आभार मानले. Kunbi students’ felicitation ceremony concluded

यावेळी मार्गदर्शक अमित आदवडे, श्री. रामचंद्र हुमणे, श्री.कृष्णा वणे, पांडूरंग पाते, गणपत पाडावे, तुकाराम निवाते, महादेव साटले, विलास वाघे, अनंत पागडे, महादेव वणे, विजय अवेरे, तुकाराम दवंडे, प्रदिप बेंडल, अनंत पागडे, संदेश कदम, उदय गोरीवले, श्रीम. वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, अमोल वाघे, संदिप पाष्टे, अनिल घाणेकर, सचिन म्हसकर, संतोष सोलकर, प्रमोद गोणबरे, विजय पागडे, प्रकाश कावणकर, संतोष मोरे, काशिनाथ मोहिते, रविंद्र आंबेकर, महेश गोणबरे, विजय मसूरकर, संदिप गोरीवले, रविंद्र कुळ्ये, वैभव बागवे, गणेश खैरे, शंकर जोशी, विलास वाघे, शंकर मोरे, सुनिल रामाणे, विजय तेलगडे, संतोष मोरे, काजुर्ली सरपंच रुक्मीणी सुवरे, पाटपन्हाळे सरपंच श्री. तेलगडे, संतोष हुमणे, वैभव बागवे, सौ. सृष्टी रेवाळे, सौ. अश्विनी मास्कर, सुशिल फडकले, संजय आग्रे, प्रणय मोहिते आदींसह समाज बांधव उपस्थित होते. Kunbi students’ felicitation ceremony concluded
