गुहागर, ता. 22 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळेमध्ये कार्यानुभव व हस्तकला व्यवसाय अंतर्गत सहशालेय उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी राख्या तयार करणे हा उपक्रम राबविण्यात आला होता. Nawanagar students prepared Rakhi

या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी छान राख्या तयार केल्या. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकास होण्यासाठी विविध नवनविन उपक्रमांचे कायम आयोजन केले जाते. सदरचा उपक्रम मुख्याध्यापक मनोज पाटील, सहशिक्षिका अंजली मुद्दमवार, पदवीधर शिक्षिका उलघना पाटील, शिक्षक परीक्षेत दाभोळकर, सोनाली खडपे, अंकिता कोळथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. Nawanagar students prepared Rakhi

