• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रेशन दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण ओक

by Ganesh Dhanawade
August 20, 2023
in Guhagar
185 2
0
Oak as President of Ration Shop Association

गुहागर ता. रेशन मालक चालक अध्यक्षपदी बाळकृष्ण ओक यांचे अभिनंदन करताना संतोष देसाई.

363
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तीन वर्षांसाठी नव्या कार्यकारणीची बिनविरोध निवड

गुहागर, ता. 20 : गुहागर तालुका रेशन दुकान मालक चालक संघटनेच्या अध्यक्षपदी वेळंब येथील बाळकृष्ण दत्तात्रय ओक यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 सदस्यांची नुतन कार्यकारिणी व 7 विभाग प्रमुखांची निवडही यांची निवडही झाली. संपूर्ण प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात, बिनविरोध पार पडल्याबद्दल संतोष देसाई यांनी सभासदांचे आभार मानले. Oak as President of Ration Shop Association

पाटपन्हाळेमधील ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये  गुहागर तालुका रेशन दुकान मालक चालक संघटनेची वार्षिक जनरल सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतोष देसाई हे होते.  या सभेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी नव्या कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून  बाळकृष्ण दत्तात्रय ओक (वेळंब), उपाध्यक्ष सौ. निकिता नितीन सुर्वे (अंजनवेल), सचिव  सचिन शांताराम वळंजु (पिंपर), खजिनदार प्रशांत प्रदीप बेर्डे (भातगांव), सल्लागार संतोष केशव देसाई (वरवेली) व प्रकाश तानाजी आग्रे (मळण), सदस्य पदी स्नेहल नवनाथ लाड (धोपावे), केशव रामचंद्र तांबे (घाडेवाडी), नितेश रवींद्र विचारे (पोमेंडी), श्रीमती सिद्धी संतोष सावंत (जामसुत), नंदकुमार गुरव (चिंद्रावळे), सर्वेश रमाकांत साळवी (खोडदे), विश्वास विनायक खरे (पाचेरी सडा), मुबिन मोहीद्दिन पेवेकर (पेवे ) यांची निवड करण्यात आली. Oak as President of Ration Shop Association

त्याचप्रमाणे  अंजनवेल विभाग प्रमुख म्हणून उर्वशी उदय धामणस्कर, पाटपन्हाळे विभाग प्रमुख उमर हुसैन लालू, पालशेत विभाग प्रमुख प्रकाश सिताराम झिंबर, हेदवी विभाग प्रमुख प्रकाश शांताराम गडदे, तवसाळ विभाग प्रमुख श्रावणी सुभाष रहाटे, भातगाव विभाग प्रमुख तुषार प्रविण हुमणे, पेवे विभाग प्रमुख म्हणून वसंत नारायण हुंबरे यांची निवड करण्यात आली. Oak as President of Ration Shop Association

मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण ओक म्हणाले की, समाजातील गोरगरीबांपर्यंत अन्नधान्य पोचविणे हे आपले काम आहे.  यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून शासनाकडून वेगवेगळ्या व्यवस्था करण्याचा आग्रह केला जात आहे. आपण सर्वजण शासन आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहोत. आपल्याला येणाऱ्या अडचणी, शासनाच्या योजनांची अमंलबजावणी करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी, ग्राहकांच्या अडचणी, ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देण्यासाठी आवश्यक विषय आदी कामांसाठी रेशन दुकान चालक मालक संघटनेद्वारे सर्वांना विश्र्वासात घेवून, सर्वांचे सहकार्याने काम केले जाईल. Oak as President of Ration Shop Association

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOak as President of Ration Shop AssociationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share145SendTweet91
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.